Skip to content

Manoj Jarange | मनोज जरांगेंवर गुन्हे दाखल; आता माघार उपोषणही स्थगित

Manoj Jarange

Manoj Jarange | कालपासून मराठा आंदोलनात काही मोठ्या घडामोडी घडताना दिसत होत्या. काल मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून, ते काल तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर आज सकाळी ते माघारी फिरले असून, त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केला. दरम्यान, आता त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली असून, त्यांनी आता आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या १५ ते १६ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत होते. सगे सोयऱ्यांच्या मागणीवर ते ठाम असून, ते अन्न, पाणी, उपचार देखील घेत नव्हते. मात्र, आता त्यांनी उपोषण मागे घतेले आहे. तर, दुसरीकडे त्यांच्या आणि त्यांच्यासोबतच्या काही आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून अंबड तालुक्यात संचार बंदी लागू करण्यात आली असून, काही भागांमध्ये इंटरनेट सेवा देखील खंडित करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे यांच्यावर होत असलेले राजकीय आरोप प्रत्यारोप आणि टिका पाहता मनोज जरांगे यांनी तुर्तास दोन पावले मागे घेत नव्याने रणनीती ठरवण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. (Manoj Jarange)

Manoj Jarange | मनोज जरांगेंची माघार; सहकारी पोलिसांच्या ताब्यात

Manoj Jarange | पुढे काय करायचे ते दोन दिवसांत…  

तर, आज त्यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे ते ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील एक-दोन दिवस मी उपचार घेऊन त्यानंतर पुढचा दौरा घोषित करेल असे ते म्हणाले.

येथे संचारबंदी लागू केल्यामुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. त्यामुळे बांधव सैरभैर झाले आहेत. पण मी सुखरुप असून, मला कोणीही कुठेही नेलेले नाही. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे. बीड, छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यातील इंटरनेट बंद केले असल्यामुळे काही अफवा पसरत असून, त्या पसरु देऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. (Manoj Jarange)

Manoj Jarange | मनोज जरांगे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना

मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात  गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरांगेंच्या सूचनेनुसार अनेक ठिकाणी रास्ता रोको केल्यामुळे मराठवाड्याचा विचार करता तब्बल १,०४१ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले असून, बीड जिल्ह्यातील ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावरदेखील शिरूर व अमनेर येथील पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे. (Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!