Skip to content

Manoj Jarange | जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल; अटकेची शंका खरी ठरणार..?

Manoj Jarange

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले असून, ते आता पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र असे १० टक्के आरक्षण हे राज्य सरकारने दिली असले, तरीही मनोज जरांगे यांनी ते आरक्षण मान्य नसून ते सगेसोयऱ्यांच्या मंगणीवरच ठाम आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप कले होते. यानंतर मात्र त्यांनी दोन पाऊले माघारी येणे पसंत केले होते.(Manoj Jarange)

मात्र, नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याला अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली होती. आणि आता १० दिवसांतच मनोज जरांगे यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. तर, आतापर्यंत त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल पायह गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, हा गुन्हा विना परवाना रॅली काढल्या प्रकरणी तसेच जेसीबीने फुलांची उधळण केल्याप्रकरणी बीडमध्ये दाखल झाला आहे. तर, याप्रकरणी फक्त मनोज जरांगेच नाहीतर त्यांच्यासह आणखी १२ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Manoj Jarange)

Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी; फडणवीस म्हणाले…

मंगळवारी मनोज जरांगे यांनी बीड दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्याणे त्यांच्या अडचणी वाढवल्या असून, परवानगी नसतांना रॅली काढल्या प्रकरणी तसेच जीसीबीने धोकादायक रित्या फुलांची उधळण केल्या प्रकरणी बीड शहरातील पेठ बीड पोलीस स्टेशन आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपळनेर व पेठ बीड पोलिसांनी याप्रकरणी मनोज जरांगे आणि इतर १२ जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. (Manoj Jarange)

धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर

मनोज जरांगे हे जिथे जिथे सभा घेतात त्या सर्व ठिकाणी स्थानिक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जय्यत स्वागत केले जाते. फटाक्यांची आतिषबाजी, मोठमोठे हार, जेसीबीणे फुलांची उधळण, गुलालाची उधळण, यासह त्यांचे जोरदार स्वागत हे मराठा समाजातर्फे केले जाते. दरम्यान, मनोज जरांगे हे काल बीड दौऱ्यावर असताना, यावेळी देखील त्याठिकाणी जेसीबीद्वारे फुल उधळून त्यांचे मराठा समाजाने जोरदार स्वागत केले. यावेळी याठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. याच सभेच्या आयोजकांवर आणि स्वतः मनोज जरांगे यांच्यावर धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात अला आहे. (Manoj Jarange)

Manoj Jarange | मनोज जरांगेंवर गुन्हे दाखल; आता माघार उपोषणही स्थगित

Manoj Jarange | या पाच ठिकाणी गुन्हे दाखल…

दरम्यान, आता पर्यंत मनोज जरांगे यांच्यावर पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, आठवड्याबहरातील हा तिसरा गुन्हा आहे. तर, यापैकी चार गुन्हे हे एकट्या बीड जिल्ह्यातच दाखल झालेले आहेत. तर, यात पहिला गुन्हा हा शिरूर पोलीस ठाण्यात, दुसरा अमळनेर ठाण्यात, तिसरा पेठ बीड पोलीस ठाण्यात, चौथा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणि नांदेड जिल्ह्यात रविवारी रात्री उशीरा सभा घेतल्यामुळे एक गुन्हा असे एकूण पाच गुन्हे मनोज जरांगे यांच्यावर दाखल झालेले आहेत. (Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!