Loksabha Election | केसाने गळा कापू नका; शिंदे गटाचा भाजपला इशारा

0
3
Loksabha Election
Loksabha Election

Loksabha Election | लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा हा आणखी गुंतागुंतीचा होत असून, महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये बिनसल्याचे दिसत आहे. अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ते यात काही मध्यस्थी करून हा वाद मिटवतील अशी शक्यता होती. मात्र, हा वाद आणखीच चिघळत असून, भाजप ३२ जागांवर अडून आहे. यातच काल मंत्री छगन भुजबळ यांनीही जितक्या जागा शिंदे गटाला दिल्या जातील, तितक्याच जागा अजित पवार गटाला देण्याची मागणी बैठकीत केल्याचे सांगितले.(Loksabha Election)

दरम्यान, ३२ जागा भाजपने घेतल्यास आणि उर्वरित जागांचे समान वाटप केल्यास शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी १० किंवा यापेक्षाही कमी जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही गटांतील नेते हे नाराज असून, आता ही नाराजी चव्हाट्यावर आली आहे. “मोदी, शाहांमुळे भाजपमध्ये आलो. आता पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने भाजपला इशाराच दिला आहे. (Loksabha Election)

Dhule Loksabha | धुळे लोकसभेतील इच्छुकांच्या गर्दीत अविष्कार भुसे ठरताय लोकप्रिय…

शिवसेना-राष्ट्रवादीच्या जागांवर जबरदस्ती केली जात आहे.  

शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते रामदास कदम हे म्हणाले आहेत की,”लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदीच पंतप्रधान होतील. पण, एक खंत आहे की, महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी हे मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही सत्तेत आलो आहोत. त्यामुळे आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. सीटींग जागांसाठीही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत असून, उमेदवारीसाठी तालुक्यात, मतदारसंघात फिरत आहेत. तसेच शिवसेना-राष्ट्रवादीच्या सींटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न केला जात आहे. (Loksabha Election)

Loksabha 2024 | अशी आहे महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची यादी..?

Loksabha Election | या भागांत भाजपचं घृणास्पद राजकारण 

युती असताना आम्ही इतका मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही विश्वासाने भाजपसोबत आलो आहोत आणि मंत्रिमंडळ बनलं. भाजपचे काही नेते हे मतदार संघातील स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून भूमिपुजन आणि उद्घाटन करित आहेत. हेच मुळात त्रासदायक असून, असं असेल तर भविष्यात भाजपवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, याची दखल देखील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घ्यायला पाहिजे. रत्नागिरी, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या भागांत भाजपचं घृणास्पद राजकारण सुरु आहे.(Loksabha Election)

‘माझं नावही रामदास कदम आहे,

आगामी लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद सुरू असल्याचे चित्र स्पष्ट आहे. यातच आता शिंदे गटाचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी “केसाने आमचा गळा कापू नका, आमचा विश्वासघात करू नका. ‘माझं नावही रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा’, असा इशाराच महाराष्ट्र भाजपला दिला आहे.(Loksabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here