Rahul Gandhi | गांधी परिवाराच्या उपस्थितीत ‘मविआ’ शिवतीर्थावर रणशिंग फुंकणार

0
3
Rahul Gandhi
Rahul Gandhi

Rahul Gandhi | राहुल गांधी यांची भरात जोडओ न्याय यात्रेचा आज समारोप होणार असून, शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून ते निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. तर आज शिवाजी पार्कवर त्यांची जाहीर सभादेखील होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही मुंबईत दाखल झाली असुन, या यात्रेचा आज समारोप होणार आहे. सायंकाळी ५ वाजता राहुल गांधींची जाहीर सभा होणार असून, यासाठी सोनिया गांधींसह इंडिया आघाडीचे प्रमुख नेतेही मुंबईत दाखल होणार आहे. त्याआधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ‘न्याय संकल्प’ पदयात्रा काढली जाणार आहे.(Rahul Gandhi)

Rahul Gandhi | नशिक कोर्टाने ठोठावली राहुल गांधींना नोटिस

Rahul Gandhi | हे नेते उपस्थित राहणार

दरम्यान, राहुल गांधी यांच्या आजच्या शिवाजी पार्क येथील जाहीर सभेसाठी इंडिया आघाडीचे बडे नेतेही उपस्थित राहणार असून, महाराष्ट्रात इंडिया आघाडीकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. तर याच सभेतून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ही भव्य सभेसाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जय्यत तयारी केली असून, राहुल गांधींच्या या समारोप सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव,(Rahul Gandhi)

उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य या प्रमुख नेत्यांसह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे १५ पेक्षा जास्त मित्र पक्षांचे प्रमुख नेते हे मुंबईत येणार आहेत. लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच सभा मुंबई येथे होणार आहे. (Rahul Gandhi)

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक

सोनिया गांधीही शिवाजी पार्कवर उपस्थित

राहुल गांधींच्या भरात जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या मुहूर्तावर दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. तर, त्यांच्या जाहीर सभेचे आयोजनही केले जाणार आहे. या सभेला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यादेखील उपस्थित राहणार आहेत. काल लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात या निवडणुका होणार असल्याची घोषणाही झाली आहे. आता लोकसभेचा काऊंटडाऊन सुरू झाला असून, सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे.(Rahul Gandhi)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here