Loksabha Election | आता रोज नवे धमाके होणार; शिंदे गटाचं मोठं विधान

0
3
Loksabha Election
Loksabha Election

Loksabha Election | देशात लोकसभेचे बिगुल वाजले असून, या पार्श्वभूमीवर आता देशासह राज्यातही अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. कालच ठाकरे गटाच्या एका बड्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता शिंदे गटातील एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला असून, लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा शिंदे गटाने केला आहे. (Loksabha Election)

कालच नंदुबार जिल्ह्यातून ठाकरेंना मोठा धक्का बसला. ज्या आमदारासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घतेली आणि त्यांना आमदार केले. त्याच आमदाराने त्यांची साथ सोडली. आदिवासी समाजासाठी आमदार पाडवी यांचं मोठं योगदान असून, काल त्यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की,”आमश्या पाडवी हे आज शिवसेनेत आले आहेत. आता यानंतर बुधवारपर्यंत रोज नवेनवे धमाके होणार आहेत, असा सूचक इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. (Loksabha Election)

Loksabha Election | तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार लोकसभा निवडणूक

Loksabha Election | शिवसेना रडतेय… 

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही आमदार संजय शिरसाटांनी निशाणा साधला असून, ते म्हणाले की,”काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप हा शिवाजी पार्क येथे होत आहे. त्यामुळे आजचा दिवस हा आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. तिथे आम्हाला फक्त बाळासाहेब ठाकरे यांचीच भाषणं ऐकण्याची सवय आहे.

आणि त्यात काँग्रेसच्या मंचावर आज उद्धव ठाकरे बसणार आहेत. त्यामुळे हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. काँग्रेस हे धोकादायक असल्याचं बाळासाहेब म्हणायचे. आज उद्धव ठाकरे हे त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात हे अत्यंत दुर्दैवी असून, शिवसेना रडतेय असं वाटतंय. काँग्रेससोबत बसणं हे उद्धव ठाकरे गटाचं पाप आहे. असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. (Loksabha Election)

Loksabha Election | केसाने गळा कापू नका; शिंदे गटाचा भाजपला इशारा

 हिंमत असेल तर ‘गर्व से कहो हम हिंदू है’ घोषणा द्या

पुढे ते म्हणाले की,”खरंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ न्यायला पाहिजे. तिथे त्यांना नतमस्तक व्हायला लावलं पाहिजे. हिंमत असेल तर तिथे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा द्या, असं आव्हानच संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. संजय राऊत हेदेखील आता लवकरच काँग्रेसमध्ये जातील. कारण राहुल गांधींसोबत आता फक्त संजय राऊतचेच फोटो लागतात. संजय राऊत यांची राजकीय महत्वकांक्षा ही वेगळी असून, तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात कोण विचारतंय का? असा टोलाही यावेळी संजय शिरसाटांनी संजय राऊत यांना लगावला.  (Loksabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here