Nashik Loksabha | नाशिकच्या जागेसाठी भाजप कार्यकर्त्यांचे कार्यालयात ठिय्या आंदोलन

0
2
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Nashik Loksabha |  गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये बिनसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंनी नाशिकचे महायुतीचे उमेदवार म्हणून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर लगेच भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन हे तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले. दरम्यान, भाजपच्या स्थानिक आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाशिकची जागा ही भाजपकडे घेण्याचा आग्रह धरला होता. एवढंच नाहीतर श्रीकांत शिंदेंनी नाव जाहीर करताना कोणाला विश्वासात घतले का नाही? असा सवालही त्यांनी केला होता. (Nashik Loksabha)

दरम्यान, काल हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट  भाजप कार्यालयातच ठिय्या मांडला होता. “नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी”, अशी घोषणाबाजीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात सुरू केली. या पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजीचा एक व्हिडीओ समोर आला असून, या व्हिडीओमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते हे जोरजोरात घोषणाबाजी करत नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेला नाहीतर भाजपला मिळावी, अशी मागणी हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. (Nashik Loksabha)

Shrikant Shinde | श्रीकांत शिंदेंनी केली हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा

मात्र, या प्रकरणामुळे आणि व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे महायुतीच्या जागावाटपाचा वाद हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत आधीच ठिणगी पडली होती. मात्र, आता हे प्रकरण आणखीच चिघळलंय. गेल्या वेळी गिरीश महाजनांसमोर श्रीकांत शिंदे यांनी भाजपला विश्वासात न घेता हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. (Nashik Loksabha)

Nashik Loksabha | तिकडे चर्चा सुरू अन् इकडे उमेदवार जाहीर..?

सध्या नाशिकची जागा ही शिवसेनेकडे असून, आपल्याबरोबर असलेल्या १३ खासदारांचे तरी तिकीट कन्फर्म व्हावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. त्यापैकी एक जागा ही नाशिकची आहे. मात्र, या जागेवर भाजपकडूनदेखील दोन ते तीन उमेदवार हे इच्छुक आहेत. त्यामुळे या जागेचा तिढा कायम असून, वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, ही चर्चा अजून सुरूच होती की, इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिकच्या जागेवर दावा केला असून, (Nashik Loksabha)

Shrikant Shinde | मुख्यमंत्र्यांच्या मुलावर भाजप आमदार नाराज

उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणाही केली. त्यामुळे नाशिकमध्ये भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला. दरम्यान, यातच काल नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. फक्त ठिय्याच नाहीतर यावेळी या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र,आता या प्रकरणाचा वरिष्ठ पातळीवर काय परिणाम होतो आणि नाशिकच्या जागेचा तिढा कसा सुटतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. (Nashik Loksabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here