Nashik | हरिश्चंद्र चव्हाण आणि शरद पवार यांच्या भेटीमागे काय दडलंय..?

0
1
Nashik
Nashik

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : Nashik | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघातील जनतेच्या मागणीमुळे व रेट्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पायाला भिंगरी लावून गाठीभेटी घेत आहेत. नुकत्याच झालेल्या शरद पवारांच्या भेटीनंतर जनतेने ठरविल्यास आपण निवडणूक लढवू, असे सूचक वक्तव्य हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले होते. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण समर्थक व आदिवासी संघटना यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी दाखवल्याने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Loksabha | नाशिकच्या जागेसाठी भाजप कार्यकर्त्यांचे कार्यालयात ठिय्या आंदोलन

विद्यमान खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या विरुद्ध दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेतकरी व आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड रोष असल्याचे कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी भाजप पक्ष नेतृत्वाला सांगूनही पुन्हा भारती पवार यांनाच उमेदवारी देण्यात आल्याने अंतर्गत पक्षातच तीव्र असंतोष उफाळून आला असून, विविध आदिवासी संघटना या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळावी यासाठी पुढे आल्या आहेत. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पिंपळगाव बसवंत, सुरगाणा, दिंडोरी, कळवण यासह येवला, चांदवड नांदगाव या विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. कार्यकर्ते माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना शांत बसु देणार नाही हे यावेळी स्पष्ट झाल्याचे दिसून आले.

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here