सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | वाजगांव ता. देवळा येथे श्रीराम मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवार दि. १४ पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या सप्ताहाचे हे पहिले वर्ष असून, गावात प्रथमच सुरु झालेल्या सप्ताह निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांचा याला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. ह्या सप्ताहात गोकुळ महाराज शिंदे (मालेगांव), बाळासाहेब महाराज (श्रीरामपूर) तात्या महाराज (भुईगव्हाण), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), अनंतदास महाराज (काजवाडेकर) यांनी आपली कीर्तन सेवा बजावली. तर मंगळवार दि. १९ रोजी नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव) आणि बुधवार दि. २० रोजी निलेश महाराज (लासलगांव), गुरुवारी दि. २१ रोजी सकाळी १० वाजता कीर्तन केसरी संजय महाराज धोंडगे (मकरंदवाडी) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम