Raj Thackeray | दिल्लीत मोठ्या घडामोडी..!; मनसे-भाजप युती होणार

0
1
Lok sabha Election
Lok sabha Election

Raj Thackeray | आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात आता अनेक मोठमोठ्या घडामोडी होताना दिसत आहे. यातच राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार आता राज्याच्या महायुतीमध्ये मनसेचाही समावेश होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून, याबाबत अमित शहांसोबत राज ठाकरेंची खलबतं सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि आशिष शेलार यांच्यासोबत भेटीगाठी सुरू होत्या. दरम्यान, काल राज ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले असून, दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. तर, त्यांच्या या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे.(Raj Thackeray)

Raj Thackeray | मनसेला एक किंवा दोन जागा

महायुतीत मनसेला लोकसभा निवडणुकीत एक किंवा दोन जागा दिल्या जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. तसेच आता कुठल्याही क्षणी मनसेचा महायुतीमध्ये समावेश झाल्याची घोषणाही केली जाऊ शकते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरे हे दिल्लीत पोहोचले. त्यानंतर आज दिल्लीत मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा झाली.

Raj Thackeray | काळारामाचं दर्शन घेऊन मनसे फुंकणार लोकसभेचे रणशिंग

या जागावाटपाच्या सूत्रानुसार दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय हा दिल्लीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर, या जागेवर मनसेचे बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज सकाळी राज ठाकरेंची दिल्ली येथे भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर हे दोघेही नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी गेले. (Raj Thackeray)

बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळणार 

आजच्या या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तीन जागांपैकी किमान दोन जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. तर, विशेष म्हणजे या तिन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत. त्यापैकी एक जागा ही मनसेला देऊन तेथून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. (Raj Thackeray)

Raj Thackeray | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील ह्या जागा देण्यासाठी होकार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु राजकीय समीकरण पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा भाजपकडे असून, तर  शिंदे गटाकडून नाशिकची जागा सोडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. तर, या जागेवरून वाद सुरू असून, स्थानिक भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतूनच बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर चारही पक्षांचे एकमत होऊ शकते. (Raj Thackeray)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here