Skip to content

Raj Thackeray | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात


Raj Thackeray |   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील यावेळी याठिकाणी उपस्थित होते. राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्यामागची दोन कारणं ही सध्या समोर आली आहेत. पहिलं कारण म्हणजे मुंबईसह राज्यातील दुकानांवरील मराठी पाट्या. सर्वोच्च न्यायालयाने दुकानावरील मराठी पाट्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर देखील अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आलीत. (Raj Thackeray)

टोल प्रश्नी चर्चा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीचा हा दुसरा महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे टोल. ऑक्टोबर महिन्यामध्येही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ह्या टोलच्या मुद्द्यावरून भेट घेतलेली होती. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबतही त्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना या संदर्भात काही आश्वासनं देखील दिलेली होती. (CM Eknath Shinde)

Manoj Jarange | मला कधीही अटक होऊ शकते; मनोज जरांगेंचा आरोप

मराठी पाट्यांचा प्रश्न ऐरणीवर

राज्यातील दुकानांवरील ठळक अक्षरातील मराठी पाट्या हा मुद्दा सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यभरात पेटलेला आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनं देखील केली जात आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून मुख्यत: मुंबई महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी कारवाई देखील केली जात आहे. पण, ही कारवाई अत्यंत थातूर-मातूर प्रकारची असल्याचा आरोपही मनसैनिकांनी केलेला आहे. त्यामुळे मनसेकडून ठिकठिकाणी खळळ- खट्याक सारखी आंदोलनं देखील केली जात आहेत. (CM Eknath Shinde)

मुख्यमंत्र्यांची पोस्ट 

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वर्ष निवासस्थानी झालेल्या ह्या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर याबाबत पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की, ”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा ह्या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली आहे. या भेटीत संपूर्ण राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न तसेच दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तसेच दंडात्मक कारवाईबाबत यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आहे. या भेटीच्या वेळी मनसेचे आमदार राजू पाटील हेदेखील उपस्थित होते.” (CM Eknath Shinde)

Horoscope | आजचा दिवस तुमच्याठी कसा जाईल? बघा आजचे राशीभविष्य


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!