Skip to content

Manoj Jarange | मला कधीही अटक होऊ शकते; मनोज जरांगेंचा आरोप

Jarange Breaking

Manoj Jarange |  “मला कधीही अटक होऊ शकते, पण ह्या अटकेला मी भीत नाही. अटक केल्यास जेलमध्येही मी उपोषण करेल” असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

..जेलच्या भिंतीवरून उडी मारेल

याबद्दल बोलतांना मनोज जरांगे पुढे म्हणाले की, “मला अटक केल्याशिवाय त्यांच्यापुढे आता दुसरा कोणताही पर्यायच नाहीये. पण, माझा मराठा समाज हा सावध आहे. तसेच मी अटकेला भीत नाही. मी कितीही वेळ आत बसायला तयार आहे. अटक केल्यावरही मी आतमध्येही उपोषण सुरु करेल. जेलमध्येदेखील मी जेवण करणारच नाही व त्यांनाही करू देणार नाही. आणि जेलच्या भिंतीवरून उडी मारेल. कारण, मी आतमध्ये जगूच शकत नाही. मराठा समाजासाठी मी जीव द्यायलाही तयार” असल्याचेही यावेळी मनोज जरांगे म्हणाले.(Manoj Jarange)

Horoscope | आजचा दिवस तुमच्याठी कसा जाईल? बघा आजचे राशीभविष्य

६ कोटी मराठा अटक व्हायला तयार

आंतरवाली सराटीतील प्रकरणात लोकांना का अटक केलं. एकालाही अटक करणार नाही असा शब्द दिलेला होता. तसेच मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेऊ असेही सांगितलेले होते. मात्र, गुन्हे मागे घेतलेच नाहीत. अटक करण्याचे कारणच काय आहे. न्यायालयीन कोठडी झाल्यावर देखील पोलीस कोठडी कशी काय दिली जाते. त्यामुळे आता आम्हाला अटक करण्याचीही शक्यता आम्हाला वाटत आहे.

परंतु, यासाठीही आम्ही तयार आहोत. पोलिसांना अटकच करायची असेल ना, तर मग सगळे ६ कोटी मराठा हे अटक होण्यासाठी तयार आहेत. अटकच कारायचीये तर सर्वांना अटक करा. आम्हाला काय कधीच सोडणार नाही का?, मराठा आरक्षणासाठी मागणी केली म्हणून आम्हाला ही काळ्या पाण्याची शिक्षा होणार आहे का?, यासाठीच आम्ही तुम्हाला सरकारमध्ये बसवलेले आहे का?, तुम्हाला थोडं तरी काही वाटलं पाहिजे. महिलांचे डोके फोडलेत, त्याबद्दल थोडीतरी माया असली पाहिजे आणि यालाच सरकार म्हणतात. असेही जरांगे यावेळी म्हणाले. (Manoj Jarange)

Weather Update | डिसेंबर-जानेवारीमधे कसे असेल हवामान? शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

बेदरेला आज जामीन मिळणार का?

आंतरवाली सराटी मधील पोलिसांवर करण्यात आलेला हल्ला तसेच दगडफेक ह्या प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे याला झालेल्या अटकेनंतर त्याला आधी न्यायालयीन तसेच त्यानंतर पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली होती. दरम्यान, अंबड येथील न्यायालयाने दिलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलीस व न्यायालयीन कोठडीची मुदत ही आज संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांकडून ऋषिकेश बेदरे याला आज अंबड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाकडून बेदरेला आज जामीन मिळते का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!