Raj Thackeray | राज ठाकरेंसमोर भाजपची अट; मनसेकडे फक्त एक दिवस

0
3
Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray |  देशात आगामी लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असून, या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी राजधानी दिल्ली येथे भेट झाली. या भेटीदरम्यान, त्यांची तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली असून, यानंतर काल दुपारी ४ वाजता राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे मुंबईला परतले. दरम्यान, महायुतीमध्ये मनसे सामील होणार असल्याचे या भेटीत निश्चित झाले असून, लोकसभा निवडणुकीत १ किंवा २ जागा या मनसेला देण्यासाठी भाजप तयार आहे.(Raj Thackeray)

Raj Thackeray | मनसेला केवळ एक दिवसांचा वेळ

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या लोकसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, मनसेच्या उमेदवाराने त्यांच्या रेल्वे इंजिन या चिन्हावर नाहीतर महायुतीच्या भाजप, शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच कमळ, धनुष्य बाण, घडयाळ यापैकी एका चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट भाजप नेत्यांनी राज ठाकरेंसमोर ठेवली असल्याची माहिती आहे. तर, हा निर्णय घेण्यासाठी मनसेला केवळ एक दिवसांचा वेळ दिला आहे.(Raj Thackeray)

Raj Thackeray | दिल्लीत मोठ्या घडामोडी..!; मनसे-भाजप युती होणार

राज ठाकरे रेल्वे इंजिनवर आग्रही, मात्र… 

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली की, “राज ठाकरे हे लोकसभा निवडणूक ही मनसेच्या रेल्वे इंजिन या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही होते. मात्र, माझ्याकडील माहितीनुसार, महायुतीतील तीनपैकी एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. कारण आम्ही या पक्ष चिन्हांचा प्रचार केला असून, या तीन पक्षांचे चिन्ह हे आता लोकांना माहिती झाले आहे. पण अंतिम निर्णय हा अमित शाह यांनीच घ्यायचा असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले.(Raj Thackeray)

पुढील १ किंवा २ दिवसांत मनसेच्या महायुती समावेशाची घोषणा केली जाऊ शकते. मात्र, अद्याप महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीला जेमतेम जागा मिळत होत्या. त्यात आता मनसेसाठी जागा सोडल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्याही वाट्याला किती जागा येतात हे पहावे लागणार आहे. (Raj Thackeray)

Raj Thackeray | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात

अमित ठाकरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार..?

महायुतीकडून मनसेला दोन जागा दिल्या जातील, याबाबत चर्चा आहे. तर, शिर्डी लोकसभा मतदार संघातून मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर हे निवडणूक लढवू शकतात. तर दक्षिण मुंबई किंवा दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदार संघांमधून अमित ठाकरे हे लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात. (Raj Thackeray)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here