Insurance | तुम्ही वाहन खरेदी केले असल्यास तुम्हाला हे माहीत हवे…

0
50
Insurance
Insurance

 Insurance |  श्री. टी.ए. रामलिंगम – (मुख्य तांत्रिक अधिकारी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स)
तुम्ही वाहन खरेदी केले असल्यास तुम्हाला माहिती हवे की, थर्ड पार्टी (टीपी) इन्श्युरन्स अनिवार्य आहे. टीपी कव्हरला “ॲक्ट ओन्ली” किंवा “लायबिलिटी ओन्ली” कव्हर म्हणून देखील ओळखले जाते. जर एखादी व्यक्ती पहिल्यांदा अनिवार्य इन्श्युरन्स कव्हरशिवाय वाहन चालविताना आढळल्यास ₹2,000/- दंड आणि/किंवा 3 महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. जर व्यक्ती दुसऱ्या वेळेस इन्श्युरन्स शिवाय वाहन चालविताना आढळल्यास तो/ती ₹ 4,000/- दंड आणि/किंवा 3 महिन्यांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेसाठी पात्र असेल. चला, टीपी कव्हर विषयी आणि इन्श्युअर्डला कशी मदत होते याविषयी जाणून घेऊया. सर्वप्रथम, तुम्हाला टीपी इन्श्युरन्स करारामध्ये वापरलेल्या खालील काही अटी समजून घेणे आवश्यक आहे : – (Insurance)

फर्स्ट पार्टी – हे इन्श्युरन्स कव्हरची खरेदी केलेल्या पॉलिसीधारकाच्या संदर्भाने आहे.
सेकंड पार्टी – हे ज्या इन्श्युरन्स कंपनीकडून पॉलिसी खरेदी केली तिच्या संदर्भाने आहे.
थर्ड-पार्टी – हे थर्ड पार्टी दायित्व सापेक्ष एमव्ही अ‍ॅक्टच्या तरतुदींनुसार इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केलेल्या जोखमीच्या संदर्भाने आहे.(Insurance)

New Rules of Insurance Sector: 1 एप्रिलपासून विमा क्षेत्राशी संबंधित अनेक नियम बदलले, जाणून घ्या सामान्यांवर काय परिणाम होईल

टीपी कव्हरद्वारे जर तुमच्या वाहनामुळे थर्ड पार्टीला नुकसान किंवा हानी झाली असल्यास तुम्हाला कायदेशीर दायित्व, वित्तीय दायित्व, अपघाती दायित्व किंवा संपत्तीच्या हानीच्या स्थितीत संरक्षण मिळते. अशाप्रकारच्या कायदेशीर दायित्वामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आणि यासाठी हजारपासून काही कोटीपर्यंत भार सहन करावा लागू शकतो. अशाप्रकारच्या आर्थिक कोंडीत अडकायचे नसल्यास टीपी इन्श्युरन्स खरेदी निश्चितच अनिवार्य असेल. मात्र, महत्वपूर्ण बाब म्हणजे टीपी कव्हरद्वारे तुमच्या वाहनाला संरक्षण मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण संरक्षणासाठी तुम्हाला सर्वसमावेशक पॉलिसीची आवश्यकता असेल.(Insurance)

समजा, तुमच्याकडे केवळ टीपी कव्हर आहे आणि तुम्ही एका टू-व्हीलरला धडक दिल्यामुळे अपघातग्रस्त झाला आहात. तुमच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. टू-व्हीलर चालक या घटनेत जखमी झाला. त्याच्या टू-व्हीलरचे देखील नुकसान झाले आणि तुमच्यावर ₹ 30,000/- देय करण्याचे दायित्व असेल. यासोबतच तुमच्या कारला देखील डेंट आहे. जर तुमच्याकडे केवळ टीपी कव्हर असल्यास पॉलिसीद्वारे केवळ उदाहरणातील जखमी व्यक्तीसाठी खर्च (उदाहरणात नमूद केल्याप्रमाणे ₹30,000/- ) अदा केला जाईल. पॉलिसी मध्ये तुमचे डेंट हटविण्यासाठी आवश्यक खर्चासाठी भरपाई दिली जाणार नाही. तुमच्या वाहनाला सुरक्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग सर्वसमावेशक इन्श्युरन्स कव्हर खरेदी करणे हाच असेल.(Insurance)

Car insurance: कार विमा काढताय तर थांबा ! , ही माहिती आहे खास तुमच्यासाठी

टीपी इन्श्युरन्स तुम्हाला खालील बाबींसाठी कव्हर देते: –
• थर्ड पार्टीचा मृत्यू किंवा शारीरिक दुखापतीच्या संदर्भात
• थर्ड पार्टीच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्यास (मर्यादित दायित्व)

टीपी इन्श्युरन्स द्वारे पॉलिसीधारकाला माफक किंमतीत मूलभूत स्वरुपाचे संरक्षण प्रदान केले जाते. टीपी कव्हर हे खिशाला परवडणारे आहे आणि भारतातील उपलब्ध इन्श्युरन्स कव्हर्सपैकी सर्वात स्वस्त आहे. कायद्यासोबत अनुपालन करतानाच टीपी कव्हरद्वारे तुम्हाला मन:शांती देखील मिळते. अपघातासारख्या दुर्दैवी घटनांमध्ये तुम्हाला थर्ड-पार्टी वित्तीय दायित्वाबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही निश्चिंतपणे सपोर्टसाठी इन्श्युररवर अवलंबून राहू शकता. टीपी इन्श्युरन्स आकलन करण्यास सुलभ आहे आणि प्रॉडक्ट फीचर्स साठी सविस्तर विश्लेषणाची देखील आवश्यकता नाही.(Insurance)

तुम्ही अगदी सहजपणे काही मिनिटांत तुमच्या इन्श्युररची वेबसाईट किंवा ॲप वरुन थेट खरेदी करू शकता. म्हणून, जर तुमच्याकडे स्वत:चे वाहन आहे आणि अद्याप तुम्ही कव्हर खरेदी केले नसेल. तर आम्ही तुम्हाला अनिवार्य असलेले किमान टीपी कव्हर खरेदीची विनंती करतो. कव्हर खरेदी करण्याद्वारे तणावमुक्त राहा आणि निर्धास्त वाहन चालवा. वाहन चालवताना संभाव्य कायदेशीर दायित्वापासून स्वत:ला मुक्त करण्यासाठी तुम्ही केवळ काही क्लिक्स दूर आहात. कृपया रस्त्यावर वाहन चालविताना तुमच्याकडे वैध कमर्शियल वाहनासाठी वैध परवाना आणि संबंधित वाहन परवाना असल्याची खात्री करा. वाहतूक नियमांचे पालन करा. तुमच्यासोबत इतरांनाही सुरक्षित करा.(Insurance)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here