BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

0
3
BJP loksabha Candidate
BJP loksabha Candidate

BJP loksabha Candidate |  आगामी लोकसभा निवडणुक या कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून, सर्वांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. दरम्यान, आता भारतीय जनता पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली आहे.(BJP loksabha Candidate)

यात महाराष्ट्राचे उमेदवार जाहीर करण्यात आले असून, महाराष्ट्रातील २० उमेदवारांसह देशातील ७२ उमेदवार भाजपने जाहीर केलेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महायुतीतील जागा वाटपावरुन बिनसल्याचे चित्र असताना आणि दोन्ही मित्रपक्ष नाराज असताना इकडे भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. यात नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भिवंडीमधून कपील पाटील आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिली असून, दुसरीकडे बहिणीच्या जागी पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. दिंडोरिमधून पुन्हा एकदा डॉ. भारती पवार यांना तिकीट मिळाले आहे. तर, धुळे लोकसभेसाठीही विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनाच तिकीट देण्यात आले आहे. (BJP loksabha Candidate)

Loksabha 2024 | अशी आहे महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची यादी..?

उमेदवार बदलाच्या चर्चा झडल्या तरी नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर, सांगलीत संजयकाका पाटील यांची उमेदवारी कायम. गेल्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बदल झालेल्या स्मिता वाघ यांना जळगावमधून संधी. उन्मेष पाटील यांंचे तिकीट कापले गेले. विदर्भातील भाजपचे चार उमेदवार जाहीर झाले. परंतु भंडारा-गाेंदियाचे सुनील मेंढे व गडचिरोलीचे अशोक नेते या विद्यमान भाजप खासदारांची नावे पहिल्या यादीत नाहीत. अमरावतीचा तिढा कायम. रामटेक, यवतमाळ-वाशिम व बुलडाण्यावर शिवसेनेने दावा केल्यामुळे भाजपच्या यादीत समावेश नाही.

Loksabha Election | आता सेलेब्रिटी आणि क्रिकेटपटूही लोकसभेच्या आखाड्यात..?

BJP loksabha Candidate | अशी महाराष्ट्रातील भाजपची उमेदवारांची यादी 

  1. रावेर – रक्षा खडसे
  2. वर्धा – अनुप धोत्रे
  3. नागपूर – नितीन गडकरी
  4. चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
  5. नांदेड – प्रताप चिखलीकर
  6. जालना – रावसाहेब दानवे
  7. दिंडोरी – भारती पवार(BJP loksabha Candidate)
  8. भिवंडी – कपील पाटील
  9. मुंबई उत्तर – पियुष गोयल
  10. मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
  11. पुणे – मुरलीधर मोहोळ
  12. सुजय विखे – अहमदनगर दक्षिण
  13. सुधाकर श्रृंगारे – लातूर
  14. रणजितसिंह नाईक निंबाळकर – माढा
  15. संजयकाका पाटील – सांगली
  16. हिना गावित – नंदूरबार
  17. सुभाष भामरे – धुळे
  18. स्मिता वाघ – जळगाव
  19. पंकजा मुंडे – बीड
  20. सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर(BJP loksabha Candidate)

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here