Nilesh Lanke | अजित पवारांना मोठा धक्का..!; बड्या नेत्याची घरवापसी

0
2
Nilesh Lanke
Nilesh Lanke

Nilesh Lanke | अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून, पारनेरचे आमदार नीलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेवारी दिली जाऊ शकते. दरम्यान, कालच भाजपाने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादि जाहीर केली असून, त्यात अहमदनगर लोकसभा मतदार संघातून सुजी विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नगर मध्ये सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके यांची लढत होणार असल्याचे दिसत आहे.(Nilesh Lanke)

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर नीलेश लंके हे अजित पवारांसोबत गेले होते. मात्र, लोकसभेच्या उमेदवारीसाठी आता ते परत शरद पवार गटात परतणार असल्याचे सांगितले जात आहे. तरी आज दुपारी ४ वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके इच्छुक होते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. दरम्यान, आज हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.(Nilesh Lanke)

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

Nilesh Lanke | आज दुपारी होणार पक्षप्रवेश 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी होत असून, अनेक बडे नेते देखील आता त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदलत आहेत. यातच आता भर पडलिय टि पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची लंके स्वतः किंवा त्यांच्या पत्नी या लोकसभा निवडणूक लढवतील, अशा चर्चा होत्या. मात्र, आता निलेश लंके हे आज दुपारी चार वाजता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.(Nilesh Lanke)

लंके हे लोकसभेसाठी इच्छुक असून, महायुतीत ही जागा भाजपला देण्यात आली असून, येथून सुजय विखे यांची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते नाराज असून, त्यांनी हा निर्णय घेतला आहे. एवढेच नाहीतर आजच्या या पक्ष प्रवेशासोबतच त्यांची अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील जाहीर होऊ शकते. (Nilesh Lanke)

Nashik Lok Sabha | यंदा निवडणुकांचा प्रचार महागला; व्हेज आणि नॉनव्हेज थाळींचेही दर ठरले

राजकारणात पुढे काय होईल हे माहिती नसते

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ४० आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. त्यात नीलेश लंके यांचाही समावेश होता. आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आज पक्षप्रवेश करणार आहे. निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण “अजून काहीही ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाक्षणाला बदलते. राजकारणात पुढील काळात घडणाऱ्या गोष्टींबाबत आत्ता चर्चा करणे हे योग्य नाही. त्याला काहीही अर्थ नसतो. तुम्ही सगळे याचे साक्षीदार आहात. राजकारणात पुढे काय होईल हे कोणालाही माहिती नसते. लोकसभा मतदारसंघात मी जनसंपर्क वाढवला असून, ही माझ्या सहकाऱ्यांचीही इच्छा आहे. पण अजून मी त्याबाबतचा कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नसल्याचे नीलेश लंके काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. (Nilesh Lanke)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here