Skip to content

Mahayuti Sarkar | मनसे-भाजप युतीच्या हालचाली; मनसेला इतक्या जागा देणार..?

Mahayuti Sarkar

Mahayuti Sarkar | गेल्या काही दिवसांपासून महायुतीत जागावाटपावरुन बिनसले आहे. जागांचा तिढा अजून तिन्ही पक्षांमध्ये कायम आहे आणि त्यातच आता आणखी एक पक्ष हा महायुतीत सामील होणार असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. मात्र आता याबाबत वेगवान हालचालीही सुरू होणार आहे. तर, या लोकसभा निवडणुकीत मनसेसाठी महायुतीचे तिन्ही पक्ष हे एक ते दोन जागा सोडण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दक्षिण मुंबईची जागा ही मनसेला देण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठक देखील होणार आहे. त्यामुळे मनसे आता महायुतीत सामील होणार का? आणि आगामी लोकसभा लढवणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.(Mahayuti Sarkar)

अधिक माहितीनुसार, भाजप व मनसे यांच्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन चर्चा सुरू असून, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या दक्षिण मुंबईत मतदार संघात शिवसेनाच नाहीतर मनसेचंही वजन आहे. त्यामुळे ठाकरेंना धक्का देण्यासाठी भाजपची मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना असल्याचे दिसत आहे. शिवसेना फूटीनंतर या मतदार संघाचा कौल हा ठाकरेंच्या बाजूने होता. त्यामुळे येथे ठाकरे सेनेला मोडीत काढायचे असेल, तर त्यासाठी समोरही ठाकरेच लागेल हे भाजपने हेरलं आणि मनसेकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे.(Mahayuti Sarkar)

Mahayuti Sarkar | जागावाटपाच्या वादात भुजबळांची उडी; असे होणार महायुतीचे जागावाटप..?

Mahayuti Sarkar | कोणत्या मतदार संघात कोणाचे वर्चस्व 

  • वरळी विधानसभा मतदारसंघ – शिवसेना (ठाकरे गट)
  • शिवडी विधानसभा मतदारसंघ – शिवसेना (ठाकरे गट)
  • भायखळा विधानसभा मतदारसंघ – शिवसेना (शिंदे गट)
  • मलबार हिल विधानसभा मतदारसंघ – भाजप
  • मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ – काँग्रेस
  • कुलाबा विधानसभा मतदारसंघ – भाजप(Mahayuti Sarkar)

Mahayuti News | राज्यात प्रचंड मोठं यश महायुती मिळवणार! तिन्ही पक्षांचा मेगाप्लॅन समोर

आधीच महायुतीत बिनसलंय आणि आता त्यात… 

लोकसभा निवडणुकांच्या तारखा या आता कधीही जाहीर होऊ शकतात. काल भाजपने राज्यातील २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मात्र, अजूनही भाजप ३० पेक्षा असत जागांवर अडून आहे. तर, शिंदे गट आणि अजित पवार गटही जास्त जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे आधीच महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये बिनसले असून, यात आता आणखी चौथ्या पक्षाची भर पडली आहे. तर, लोकसभा निवडणुकींसाठी मनसे आता महायुतीत सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता मनसे जर महायुतीत आली आणि मनसेने लोकसभा लढवण्याची तयारी दाखवली. तर त्यांच्या वाट्याला किती आणि कोण कोणत्या जागा येणार आहे पाहावं लागणार आहे. (Mahayuti Sarkar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!