Skip to content

Loksabha Election | तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार लोकसभा निवडणूक

Loksabha Election

Loksabha Election | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू असून, आचारसंहितेच्या आधीच सरकारने जीआरचा धडाका लावला आहे. दरम्यान, बहुप्रतीक्षित अशा लोकसभा निवडणुकींबाबत अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुक ही एप्रिलमध्ये होणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने देशातील लोकसभा निवडणुकींची घोषणा केली आहे.(Loksabha Election)

Loksabha Election | घरी जाऊन मतदान करून घेणार 

याबाबत आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की,”केंद्रीय निवडणुक आयोग निवडणुकांसाठी तयार असून, यावेळी ९७ कोटींहून जास्त मतदार मतदान करणार आहेत. तर, ५५ लाख ईव्हीएम हे निवडणुकीसाठी तयार करण्यात आले आहे. दिड कोटी निवडणूक अधिकारी आणि साडे दहा लाख पोलिंग बूथ देखील तयार आहेत.

प्रत्येक बुथवर वीजेची, पिण्याच्या पाण्याची आणि ऊन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी छताची सोय करण्यात आली आहे. पोलिंग बुथवर न येऊ शकणाऱ्यांसाठी घरोघरी मतदानाची सोय. ८५ वर्षांवरील व्यक्तींचे घरी जाऊन मतदान करून घेणार. उमेदवाराबाबतची प्रत्येक माहिती ही वेबसाइटवर मिळेल. निवडणुकीत हिंसेला स्थान नाही. हिंसामुक्त निवडणूक राबवणे ही आमची जबाबदारी असेल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.(Loksabha Election)

Loksabha Election | लोकसभा निवडणूक कधी? मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

गैरप्रकार सुरू असल्यास त्याचा फोटो काढून पाठवा

यावेळी ते म्हणाले की, “मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखणे हे आमच्या समोरील सगळ्यात मोठे आव्हान होते. कुठे पैसा वाटप सुरू असेल, कुठेही काही गैरप्रकार सुरू असल्यास त्याचा फोटो काढून ‘C विजील’ ॲपवर टाका. तुमच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून आमची टीम तिथे अगदी १०० मिनिटात पोहचेल. तसेच राजकिय पक्षांमध्ये आणि त्यांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. त्यामुळे स्टार कँपेनर्सनाही नोटीस देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.(Loksabha Election)

Loksabha Election | महाविकास आघाडीत कोणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ..?(

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे..?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ(Loksabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!