Skip to content

ShivSena | बड्या नेत्यांना नाराज करून ज्याला आमदार केलं; तोच आमदार साथ सोडणार..?

Loksabha Election

ShivSena | कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे आता देशासह राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खान्देशातून मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. बड्या नेत्यांना बाजूला करून ज्या नेत्याला उद्धव ठाकरे यांनी आमदार केले. ज्याच्यासाठी ठाकरेंनी आपल्या पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली. तोच आमदार आता ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करणार आहे. (ShivSena)

एवढेच नाहीतर, या आमदाराला विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वतः मैदानात उतरले असून, त्यांनी यासाठी जीवाचे रान केले होते. दरम्यान, आता हाच आमदार उद्धव ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करणार करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असून, यासाठी ते त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे निघाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून आमदार आमश्या पाडवी हे ठाकरे गटाची साथ सोडणार असून, माहितीनुसार ते आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश करणार आहे. (ShivSena)

ShivSena | शिंदे गटाच्या आमदाराची युवकांना मारहाण

ShivSena | कोण आहेत आमदार आमश्या पाडवी?

शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्या निवडणुकीत एकही आदिवासी चेहरा नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील एक नेतृत्व असलेले आमश्या पाडवी यांना गेल्या निवडणुकीत संधी दिली होती. आमश्या पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष मोठा केला. त्यामुळे त्यानकी कार्याचे त्याचे बक्षीस म्हणून २०२२ च्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, येथील अनेक बड्या नेत्यांना डावूलन त्यांना संधी दिल्याने अनेक नेते नाराज होते. त्यांची नाराजी ओढवून घेत ठाकरेंनी पाडवी यांना संधी दिली होती.(ShivSena)

मात्र, याआधीही अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी 2014 आणि 2019 अशी दोन वेळा निवडणूक लढवली. मात्र, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात त्यांना पराभव स्वीकारावा लागेल. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेत संधी दिली होती.(ShivSena)

Shivsena | आता उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ही जाणार..?

नंदुरबारचे लोकसभा निवडणुकींचे राजकारण 

दुसऱ्या यादीत भाजपने नंदुरबार लोकसभेच्या उमेदवाराचेही नाव जाहीर केले आहे. येथूनही भाजपने विद्यमान खासदार हीना गावीत यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा संधी दिली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि काँग्रेसचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांची गुप्त भेट झाली आहे. त्यामुळे आता या भेटीमागचे गुपित काय असेल हे पहावे लागणार आहे.(ShivSena)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!