Skip to content

ShivSena | शिंदे गटाच्या आमदाराची युवकांना मारहाण

ShivSena

ShivSena | शिंदे गटाचे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते त्यांच्या रोखठोक व्यक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीसाठी ते चर्चेत होते. या मुलाखतीने त्यांच्या अडचणी वाढवल्या होत्या. तर, यावेळी त्यांनी १९८७ मध्ये आपण वाघाची शिकार केल्याचे सांगितले होते. तसेच त्या शिकार केलेल्या वाघाचा दात आपण गळ्यात बांधला असल्याचेही यावेळी ते म्हणाले. (ShivSena)

त्यांचे हे विधान समोर आल्यानंतर वनविभाग सक्रीय झाले असून, वन विभागाने तो कथित वाघाचा दात जप्त करत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. तसेच आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. हे प्रकरण मिटते की त्यातच आता त्यांचा पुन्हा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायलर होत असून, या व्हिडिओत ते एका मिरवणुकीत युवकांना काठीने मारहाण करताना दिसत आहेत. (ShivSena)

ShivSena | नेमकं प्रकरण काय..?

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शिवजयंतीच्या मिरवणुकीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओ मध्ये ते मिरवणुकीतील युवकांना काठीने मारताना दिसत आहे. आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन मिरवणुकीतील युवकांना सपासप मारत आहेत. त्यामुळे शिवजयंतीच्या या मिरवणुकीत एकच गोंधळ उडाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, यावेळी पोलीस कर्मचारी देखील तिथे उपस्थित असल्याचे या कथित व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. आमदार गायकवाड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून, ही घटना बुलढाणा शहरातील आहे. मात्र, अद्यापही या घटनेवर पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. (ShivSena)

गुन्हा दाखल 

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्यावर आधीच एक गुन्हा दाखल आहे. आता त्यांच्यासोबतच त्यांचे सुपुत्र मृत्यूंजय गायकवाड हे देखील अडचणीत सापडले आहे. या दोघं बापलेकांवर शेत जमीन बळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या प्रकरणात न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी आदेश दिले असून, यानंतर अखेर २८ फेब्रुवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमधील रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय यांनी या प्रकरणी १२ ऑगस्ट २०२१ मध्ये तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून कुठलीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले होते. (ShivSena)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!