Shivsena | आता उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ही जाणार..?

0
4
Shivsena
Shivsena

Shivsena |  राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडी पाहता, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एक मोठी बातमी उद्धव ठाकरे गटाच्या गोटातून समोर आली आहे. यानुसार, आता उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह असलेल्या मशालीवरही गदा येणार असल्याचे दिसत आहे.(Shivsena)

सध्या उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या गटाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. आधी शिवसेनेचे मालेगावचे नेते अद्वय हिरे यांची अटक आणि त्यांच्यावरील आरोप. त्यानंतर ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोप. त्यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला आणि ठाकरेंच्या रवींद्र वायकर, राजन विचारे आणि राजन साळवी या नेत्यांवर एकापाठोपाठ ईडी आणि लाचलुचपत विभागाची धाड.

Shivsena | जे सुप्रीम कोर्टाला अमान्य ते सारे नार्वेकरांच्या कोर्टात मान्य

Shivsena | आधी धनुष्यबाण आणि आता मशालही जाणार..?

दरम्यान, आता ठाकरेंच्या मशालीवरही आता एका पक्षाने दावा केला आहे. याधीच पक्षाचे नाव आणि अधिकृत ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले होते. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनीही निकाल हा एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला होता. तसेच शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यताही दिली होती. मात्र, निकाल मान्य नसल्यामुळे ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, आता ठाकरे गटाला मशालीवरही पाणी सोडावे लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या निवडणूक चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला आगामी निवडणुकांमध्ये मशाल पेटवता येईल का? हे पहावे लागणार आहे.(Shivsena)

Shivsena Result | आमदार अपात्रता निकाल; शिंदे सेनाच खरी शिवसेना

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालामुळे ठाकरे गटाला आता मशालीवरच निवडणूक लढवावी लागणार होती. मात्र, मशालही गेली तर आता काय?. असा प्रश्न ठाकरे गतासांपोर उभा राहिला आहे. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर समता पार्टीने दावा केला असून, त्यांचे म्हणणे आहे की हे चिन्ह आमच्या पक्षाचे आहे आणि आमची एक राष्ट्रीय पार्टी आहे. बिहार, मणिपूर तसेच इतर ठिकाणीही निवडणुक  आम्ही मशाल चिन्हावरच लढलो आहोत.(Shivsena)

दरम्यान, आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय पक्षांना आता चिन्हांसाठी महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. त्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केली असून, आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही ‘मशाल’ या चिन्हाचा दावा करणार असल्याचे समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याण येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.(Shivsena)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here