Chhagan Bhujbal | उमेदवाराचे नाव जाहीर केलेच कसे?; भुजबळ श्रीकांत शिंदेंवर संतापले

0
3
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal |  गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, यामुळे नाशिकच्या जागेवरून सत्ताधारी गोटात रस्सीखेच सुरू आहे. या जागेसाठी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटही आग्रही आहे. त्यामुळे या जागेचा तिढा कायम आहे. मात्र, नुकतंच श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली.

विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची ही दुसरी टर्म असून, त्यांना हॅटट्रिक पूर्ण करायची आहे. त्यामुळे ते उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपचेही अनेक उमेदवार या जागेसाठी इच्छुक असून, अजित पवार गटही या जागेसाठी आग्रही आहे. त्यांना मंत्री छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यायची आहे. (Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | दादांना मुख्यमंत्री करायचंय; भुजबळांचा पवारांना थांबण्याचा सल्ला

तुम्ही नाव जाहीर केलेच कसे?

दरम्यान, श्रीकांत शिंदेंच्या या घोषणेमुळे महायुतीत बिनसल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाल्याने इतर दोन्ही मित्रपक्ष मैदानात उतरले असून, यानंतर तातडीने भाजप नेते गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झाले. जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आणि नाशिकची जागा भाजपकडे घेण्याची मागणी केली.

आता भाजपनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तर यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी श्रीकांत शिंदेंना प्रश्नही केला आहे. उमेदवाराबद्दल निकाल होत नाही तोपर्यंत तुम्ही नाव जाहीर केलेच कसे? असा थेट सवाल श्रीकांत शिंदेंना केला आहे. त्यामुळे आधीच जागावाटपावरुण बिनसलेल्या महायुतीच्या वणव्याने नाशिक लोकसभेच्या जागेवरून आणखी पेत घेतला आहे. (Chhagan Bhujbal)

Chhagan Bhujbal | नाशिकमधील अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे मंत्री भुजबळांचे निर्देश

Chhagan Bhujbal | हेमंत गोडसेंना विरोध स्वाभाविक

दरम्यान, यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “भाजप नेत्यांकडून हेमंत गोडसे यांना विरोध होणे हे स्वाभाविक आहे. कारण श्रीकांत शिंदे यांना उमेदवार जाहीर करण्याचा कुठलंही अधिकार नसून युतीत सगळ्यांनीच थोडीफार शिस्त ही पाळलीच पाहिजे. जोपर्यंत उमेदवाराबाबत कुठलाही निकाल होत नाही. तोपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर केलेच कसे? असा सवालही त्यांनी शिंदेंना केला.(Chhagan Bhujbal)

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

मला याबाबत कुठलीही माहिती नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे याबाबत सविस्तर सांगतील. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अडचण होणार आहे. बैठक घेता येतात मात्र उमेदवाराला पैसे लावावे लागतात. महायुतीत मनसेला जागा देण्याबाबत भुजबळांनी सांगितले की, “त्याबाबत मी काहीही अभ्यास केलेला नाही. मी काही एवढा ज्ञानी नाही, असे म्हणत टयांनी यावर बोलणे टाळले.(Chhagan Bhujbal)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here