Skip to content

Maharashtra Schools | शाळांबाबत मोठा निर्णय; शिक्षकांची प्रतिष्ठा वाढणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने जीआर चा धडाका लावला आहे. यातच आता सरकारने शैक्षणिक क्षेत्रातही एक मोठा निर्णय घेतला असून, यानुसार आता राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांनाही आता शाळेत शिस्त पाळणे बंधनकारक असणार आहे. राज्य शसनाच्या या निर्णयामुळे आता सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष आणि महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल त्या रंगाच्या ड्रेसकोडचे पालन करणे हे बंधनकारक असणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी ही मोठी घोषणा केली आहे. (Maharashtra Schools)

Maharashtra Schools | नेमके काय बदल होणार 

दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलेल्या या निर्णयानुसार राज्यातील शाळांमधील शिक्षकांना ड्रेसकोड लागू होणार असून, असे झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे शाळेत घालता येणार नाहीत. राज्यातील सर्व शाळेतील सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने निश्चित केलेले कपडेच परिधान करावे लागणार आहेत.

Dipak kesarkar : त्या वक्तव्यामुळे शिक्षणमंत्री दीपक केसरकर वादाच्या भोवऱ्यात

महिला शिक्षकांचा ड्रेसकोड हा साडी किंवा सलवार-चुडीदार, कुर्ता,दुपट्टा असा असेल. तर पुरूष शिक्षकांचा ड्रेसकोड हा शर्ट-ट्राउझर पँट असा असेल. पुरूष शिक्षकांचा शर्ट हा इन केलेला असावा. तसेच गडद रंगाचे किंवा चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे घालता येणार नाहीत. कुठल्याही शिक्षकांनी जीन्स किंवा टी-शर्टचा वापर हा शाळेमध्ये करू नये या मार्गदर्शक सूचनाही शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.(Maharashtra Schools)

Tr. लावता येणार 

एवढेच नाहीतर, आणखी एक शिक्षकांची प्रतिष्ठा वाढवणारा निर्णय घेण्यात आला असून, शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, या निर्णयानुसार शिक्षकांना समाजातील प्रतिष्ठा आणखी वाढणार आहे. तर यामुळे जसे डॉक्टर नावाआधी डीआर (Dr) लावतात किंवा ॲडव्होकेट हे त्यांच्या नावाच्या आधी ॲड. असे संबोधन लावतात. तसेच शिक्षकांनाही आता त्यांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr.) तर मराठीत (टि.) असे संबोधन लावण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नाहीतर हे संबोधन शिक्षकांना त्यांच्या वाहनावर देखील हे लावता येणार आहे किंवा त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावता येणार आहे, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.(Maharashtra Schools)

Education News | आता शालेय अभ्यासक्रमात ‘या’ नव्या विषयाचा समावेश


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!