Lok sabha Election | भाजपची मोठी ऑफर?; राज ठाकरे ‘शिवसेना प्रमुख’ होणार?

0
3
Lok sabha Election
Lok sabha Election

Lok sabha Election | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप – मनसे युती होण्याबाबत अनेक बड्या नेत्यांनी जाहीर केले असून, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी ठाकरेंनी २ जागांचा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, यानंतर आता भाजपने मनसेला आणखी एक मोठी ऑफर दिली असून, यानुसार राज ठाकरेंच्या हाती शिवसेना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Lok sabha Election)

दरम्यान, आधी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात युतीबाबत चर्चा झाली. यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची बैठक झाली. ही चर्चा केवळ युती आणि जागावाटप इथपर्यंतच मर्यादित नसून, राज ठाकरेंना महायुतीत घेण्यामागे भाजपचा मोठा प्लॅन असल्याचे दिसत आहे.

राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन भाजपने राज ठाकरेंसमोर ३ पर्याय ठेवले असल्याची माहिती समोर आली असून, यापैकी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पर्याय म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करावं आणि शिवसेनेचा धनुष्य बाण ठाकरेंनी चालवावा अर्थात शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंनी करावं.(Lok sabha Election)

Raj Thackeray | राज ठाकरेंसमोर भाजपची अट; मनसेकडे फक्त एक दिवस

Lok sabha Election | राज ठाकरेंचे विचारमंथन..?

एकनाथ शिंदेंनी आपल्या ४० आमदारांसह शिवसेना सोडली. यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्ह हे शिंदेंना सोपवले. उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंनी हाती घेतलेली ही शिवसेना आता राज ठाकरेंकडे देण्याचा प्रस्ताव भाजपने मांडला आहे. दारम्यान, या पर्यायावर तात्काळ होकार देण्यास राज ठाकरेंनी अद्याप नकार दिला असून, आधी इतर पर्यायांचा ते विचार करणार आहेत.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर अनेकवेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंमुळंच शिवसेना सोडल्याचं सांगितलं होतं. सध्या शिवसेनेचं शिवसेनाप्रमुख पद हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असून, राज ठाकरेंना दिलेल्या या प्रस्तावाचा उद्देश म्हणजे शिवसेना दुसऱ्या ठाकरेंच्या हाती जाईल, असा असल्याचे सांगितले जात आहे. (Lok sabha Election)

Raj Thackeray | दिल्लीत मोठ्या घडामोडी..!; मनसे-भाजप युती होणार

सत्तेसाठी न झुकणारे राज ठाकरे आपला पक्ष संपवतील..?

१. दरम्यान, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात पहिला प्रश्न म्हणजे मनसेच्या स्थापनेपासून ‘एकला चलो रे’ ही भूमिका असणारे आणि सत्तेसाठी कोणासमोरही न झुकणारे अशी ख्याती असणारे राज ठाकरे हे आपला पक्ष संपवून शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारतील का?. मनसे शिवसेना झाल्यास मनसेचं काय..?

२. शिवाय एवढा मोठा निर्णय घेऊन गुवाहाटी ते मुख्यमंत्री पदाची मजल मारणारे एकनाथ शिंदे कोर्टाचा लढा देऊन मिळवलेला आपला पक्ष असा अचानक राज ठाकरेंच्या हाती देणार का..? आणि शिंदेंनी केलं तरी त्यांच्यावर विश्वास ठेऊन आलेल्या त्यांच्या ४० आमदार आणि १३ खासदारांना हे मान्य असेल का..?(Lok sabha Election)

३. राज ठाकरे अध्यक्ष झाल्यास स्वतःच्याच पक्षात शिंदेंकडे दुय्यम नेतृत्व येईल का..? एकनाथ शिंदेंचा आणि राज ठाकरेंचा रोल काय असेल? राज ठाकरेंच्या मनसैनिक आणि शिंदेंच्या शिवसैनिक हे मान्य करतील..? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, याची उत्तरं ही आगामी निवडणुकांच्या काळात मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात काही तथ्य आहे की फक्त राजकीय धुरळा उठवण्यासाठीची ही चर्चा आहे हे रहस्य येणाऱ्या काळात उलगडेलच.

Raj Thackeray | काळारामाचं दर्शन घेऊन मनसे फुंकणार लोकसभेचे रणशिंग

राज ठाकरेंसमोरील आणखी दोन पर्याय

भाजपची राज ठाकरेंना दुसरी ऑफर म्हणजे मनसेनं महायुतीच्या गोटात सामील व्हावं आणि महायुतीच्या फॉर्म्युलानुसार मनसेला लोकसभेत २-३ जागा दिल्या जातील. तर, तिसरा पर्याय आहे की लोकसभेला जागा न देता विधानसभेला जास्त जागा देऊ आणि आता राज ठाकरेंनी महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावं. आता यापैकी कोणट्या पर्यायावर राज ठाकरे शिक्का मारणार हे २-३ दिवसांत कळेलच. (Lok sabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here