Skip to content

Arvind Kejriwal | केजरीवाल तुरुंगातून राजधानीचा कारभार चालवणार

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal |  २१ मार्च गुरुवारी रोजी रात्री उशिरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. २८ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर मात्र आता दिल्लीचे सरकार कोण चालवणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जल मंत्रालयाशी संबंधित एक आदेश तुरुंगातून जारी केला आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल हे तुरुंगातूनच दिल्लीचा सरकार गाडा हाकणार हे स्पष्ट झालं आहे. (Arvind Kejriwal)

दरम्यान, अरविंद केजरिवाल यांची ही अटक लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, ही अटक सूडबुद्धीने करण्यात आल्याचे आरोप आम आदमी पार्टीने केले आहेत. तर, ईडीच्या या कारवाई विरोधात ‘आप’ने मोठं आंदोलनदेखील सुरू केलं आहे.

Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री केजरिवाल यांना अटक; नेमकं प्रकरण काय..?

Arvind Kejriwal | तुरुंगातून सरकार चालवणार

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीचे सरकार कसे चालणार असा सवाल सर्वांनाच पडला होता. दरम्यान, यानंतर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी किंवा दिल्लीच्या मंत्री व केजरीवाल यांच्या विश्वासू आतिशी यांनी हे सरकार चालवावं अशा अनेक पर्यायांवर विचार विनिमय करण्यात आला आणि यानंतर आता अरविंद केजरीवाल हेच तुरूंगातून सरकार चालवतील हे स्पष्ट झाले आहे. कायद्यानुसार कुठल्याही राज्यच्या मुख्यमंत्र्यांना अटक केल्यानंतर ते तुरुंगातून सरकार चालवू शकत नाही असे कोणतेही निर्बंध नाहीत, किंवा तसा कोणताही कायदा नाही. त्यामुळे या पर्यायाचा आप पक्ष अवलंब करू शकतो. (Arvind Kejriwal)

Arvind Kejriwal | अन् भाजपने ‘आप’च्या अडचणी वाढवल्या..?

… तरीही २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी

अरविंद केजरीवाल यांनी काल दिल्ली हाय कोर्टात ईडीच्या अटकेला आव्हान दिलं असून, त्यांची लीगल टीम ही तत्काळ उच्च न्यायालयाकडे या प्रकरणाची सुनावणी घेण्याबाबत विनंती करणार आहे. मात्र, होळीमुळे न्यायालय बंद असल्याने या याचिकेवर २७ मार्चपूर्वी सुनावणी होऊ शकत नाही. या याचिकेत केजरीवाल यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला आहे. मात्र कनिष्ठ न्यायालयातर्फे केजरीवाल यांना चौकशीसाठी २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. (Arvind Kejriwal)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाची तयारी व त्याची अंमलबजावणी यात कथित भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंग केल्याचे आरोप आहेत. त्यानंतर हे धोरण नंतर रद्द करण्यात आले होते. तर, या प्रकरणी आधीच आपचे प्रमुख नेते मनीष सिसोदिया व संजय सिंह हे न्यायालयीन कोठडीत असून, आता ईडीने मुख्यमंत्री केजरिवाल यांनाही अटक केली आहे. इडीच्या आरोपपत्रात केजरीवालांच्या नावाचा अनेकदा उल्लेख आहे.(Arvind Kejriwal)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!