Kangana Ranaut | भाजपच्या पाचव्या यादीत राज्यातील या उमेदवारांना संधी

0
5
Kangana Ranaut
Kangana Ranaut

Kangana Ranaut |  भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून, यात १११ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात भाजपने बॉलीवुड अभिनेत्री कंगणा राणौत आणि छोट्या पडद्यावर ‘रामायण’ मालिकेत ‘श्रीरामाची’ भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांच्याही नावाचा समावेश आहे. तर, या यादीत महाराष्ट्रातीलही तीन नावांचा समावेश आहे. यावेळी पुन्हा भाजपने विद्यमान खासदारांनाच संधी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना लोकसभेत उमेदवारी देण्यात आली असून, गडचिरोली-चिमूर येथे अशोक महादेवराव नेते यांना तर आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना भाजपने लोकसभेचे तिकीट दिले आहे. (Kangana Ranaut)

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

Kangana Ranaut | दोन विद्यमान खासदारांना पुन्हा संधी

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातही पुन्हा विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच तिकीट देण्यात आले आहेत. तर सुनील मेंढे यांना यावेळी दुसऱ्यांदा लोकसभेचे तिकीट दिले असून, ही त्यांची लोकसभा निवडणुकीची दुसरी वेळ आहे. तर, भाजपने ज्या खासदारांची हॅटट्रिक करण्याची इच्छा पूर्ण केली आहे. त्यात अशोक नेते यांचाही नंबर लागला आहे. ही त्यांची लोकसभा निवडणुकीची तिसरी वेळ असून, विद्यमान खासदार अशोक नेते हे गेल्या दहा वर्षांपासून गडचिरोलीचे खासदार आहेत.(Kangana Ranaut)

कंगना राणौतला या मतदार संघातून तिकीट  

दरम्यान, अभिनेत्री कंगणा राणौत हिला तिचे मूळ राज्य हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. तर रामायण मालिकेतील अभिनेते अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.

BJP Lok Sabha | भाजपची रणनीती ठरली; कोणत्या जागेवर कोणता उमेदवार..?

भाजपने प्रत्येक मतदारसंघात सर्व्हे केला

भाजपने प्रत्येक मतदारसंघात सर्व्हे केला असून, प्रत्येक मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतं याचा अभ्यास करुनच उमेदवारी देण्याचे ठरवले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने २३ जागांवर विजय मिळवला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सांगितलं होतं की,”आमची लोकसभा उमेदवारांची यादी ही जवळपास जाहीर झाली आहे.(Kangana Ranaut)

आता केवळ काही जागांसाठी उमेदवारांची यादी घोषित केली जाईल, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यानंतर आता भाजपने राज्यातील तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या जागांवरच भाजप निवडणूक लढवणार आणि उरलेल्या जागा या शिंदे गट आणि अजित पवार गट लढवणार का..? हे येणाऱ्या काही दिवसांत समोर येणार आहे. (Kangana Ranaut)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here