Skip to content

Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री केजरिवाल यांना अटक; नेमकं प्रकरण काय..?

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal |  देशाच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली असून, यानुसार राजधानी दिल्लीत मोठ्या  राजकीय घडामोडी घडत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तब्बल दोन तास त्यांच्या निवासस्थानी चौकशी झाली आणि यानंतर आता तपास यंत्रणेने केजरीवाल यांना सीएम हाऊस येथून अटक केली आहे. याआधी ईडीने अरविंद केजरीवाल यांचा मोबाईल जप्त केला होता. गेल्या दोन तासांपासून त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या घराभोवती १४४ कलम लागू करण्यात आला असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.(Arvind Kejriwal)

तपासात सहकार्य करत नव्हते

अधिक माहितीनुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे इडिला तपासात सहकार्य करत नव्हते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घराबाहेर निदर्शने करत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते मंत्री आतिशी आणि सौरभ हेदेखील याठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रॅपिड अॅक्शन फोर्स आणि दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सकाळच्या सुमारास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकपूर्व जमीन फेटाळला होता. (Arvind Kejriwal)

Arvind Kejriwal | अन् भाजपने ‘आप’च्या अडचणी वाढवल्या..?

Arvind Kejriwal | नेमकं प्रकरण काय..?

1. हे प्रकरण २०२१ मधील दिल्लीच्या नवीन दारू विक्री धोरणाशी निगडीत आहे (जे आता रद्द  केलेले आहे). मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सरकारने २०२१ मध्ये मद्यविक्रीचे धोरण तयार केले होते. ज्यात कथित घोटाळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान, वाद वाढल्यानंतर ते धोरण रद्द करण्यात आले.

2. या धोरणात दिल्ली सरकारचा मद्य विक्रीशी कुठलाही संबंध नसून केवळ खासगी दुकानांनाच दारू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. दारूचा काळाबाजार रोखणे, महसूल वाढ व ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी हा त्यामागील उद्देश होता. मनीष सिसोदिया हे दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख असून, त्यांच्यावर या घोटाळ्याचा आरोप केले असून, त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

3. तसेच या धोरणाच्या अंतर्गत दिल्लीत दारूची घरपोच डिलिव्हरी व दारूची दुकाने पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देखील देण्यात आली होती.

Arvind kejriwal: केजरीवाल – ठाकरे युतीची नांदी? केजरीवाल म्हणाले….

4. या नव्या मद्यविक्री धोरणात दारू पिण्यासाठीचे वयही कमी करण्यात आले होते. त्यावरून आप सरकार दिल्लीतील तरुणांना नशेच्या आहारी नेत असल्याचे आरोप भाजपने केले होते.

5. केजरिवाल सरकारने या धोरणामुळे आर्थिक उत्पन्नात २७ टक्के वाढ केली. ज्यामुळे सुमारे ८,९०० कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळाले. यावेळी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व दिल्लीचे राज्यपाल व्ही.के सक्सेना यांनी या प्रकरणी गैरप्रकार झाल्याचे म्हटले होते. तर, यानंतर उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

6. सीबीआयच्या आरोपपत्रात दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख सिसोदिया यांचे नाव अद्याप आलेले नाही, परंतु गेल्या वर्षी सीबीआयने त्यांच्या घरी आणि तब्बल ३१ ठिकाणी छापे टाकले व आता त्यांनाही अटक केली आहे. या प्रकरणी यापूर्वीही अनेक जणांना अटक झाली आहे.(Arvind Kejriwal)

7.  याआधी सीबीआयने तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता हीचे पूर्वीचे सीए बुचीबाबू गोरंतला यांना अटक केली असून, १२ डिसेंबर रोजी सीबीआयच्या पथकाने कविता यांची देखील हैदराबादमध्ये ७ तास चौकशी केली. कविता यांनी या मद्य धोरण प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!