Eknath Shinde | ‘बिलो द बेल्ट टीका’ नको; एकनाथ शिंदेंच्या १२ सूचना

0
1
Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde |  काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्या यानंतर सर्वच पक्षांनी आपापले मतदान  गुंढाळण्यासाठीची जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि लोकसभा निरीक्षकांनाही प्रचार सुरू करण्यापूर्वी अनेक महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.(Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष मेळाव्यात पक्षाच्या सर्व पक्ष प्रवक्त्यांना संबोधित केले. यावेळे त्यांनी व एकूण १२ सुचनाही दिल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, “एका ठिकाणी केलेल्या आरोप प्रत्यारोपांचे पडसाद सर्वत्र उमटत असतात. पक्षाच्या भूमिकेविरोधात कुणालाही जाता येणार नाही. आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. आणि ते कोर्टात टिकणारं आरक्षण आहे. पोलीस भरती देखील या आरक्षणानुसारच होणार आहेत. मराठा समाजाला न्याय दिला पण ओबीसींवर अन्यायही केला नाही”.(Eknath Shinde)

Eknath Shinde | मी मेहनती, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे; माझ्यावर मोदींची जादू

Eknath Shinde | सरकारने केलेली कामे मुद्देसूद मांडा

विरोधक हे खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. पण आपण मात्र आपली पातळी सोडायची नाही. कोणालाही शिव्याशाप द्यायचे नाही. विरोधकांना तुम्ही एक्स्पोज करा. त्यांनी हिंदूत्व सोडलं, त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. शिवाजी पार्कवर ‘हिंदू बांधव भगिनी’ म्हणायचीही त्यांना लाज वाटली. बाळासाहेबांच्या इच्छेच्या विरोधात ते वागत आहेत. कोणीही ‘बिलो द बेल्ट’ टीका करू नका. विरोधकांचा खरा चेहरा जनतेसमोर आणा. सरकारने केलेली कामे जनतेसमोर मुद्देसूदपणे मांडा, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी प्रवक्त्यांना केल्या आहेत.(Eknath Shinde)

Eknath Shinde | ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांना अटक करा..?

अशा आहेत शिंदेंच्या १२ सूचना 

 1. निवडणुकीसाठी पक्षांची मध्यवर्ती कार्यालय ही २४ तास सुरू असणार आहे.
 2. प्रत्येक विधानसभा मतदार संघात कार्यालय कार्यान्वित करून तिथे कामाला सुरुवात करा.
 3. विधानसभा मतदार संघनिहाय बैठका घया आणि संघटना ॲक्शन मोडमध्ये आणा.
 4. प्रत्येक शाखांशी संपर्क ठेवा, महायुतीच्या स्थानिक नेतृत्वाशी समन्वय ठेवा. त्यांच्या बैठका, संयुक्त मेळावे, संयुक्त प्रचार, चौक सभा, घ्याव्यात.(Eknath Shinde)
 5. प्रत्येक वोटिंग स्लिप वाटाव्या. मोठ्या सभा रॅली यासाठी सर्वांनी समन्वय राखून काम करा.
 6. प्रचार साहित्यावर प्रोटोकॉलनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावे व फोटोंचा वापर करा.
 7. प्रचार आणि सभांच्या संपूर्ण नियोजनावरती पारित लक्ष ठेवावे.
 8. महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स पोस्टर होर्डिंगसाठी परवानगी घ्या.
 9. स्थानिक पातळीवर मतं वाढवण्यासाठी विविध जाती, धर्म आणि सामाजिक संघटनांशी संपर्क ठेवा.
 10. समोरच्या गटातील नाराज पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा. पक्ष प्रवेश अथवा वोटिंगसाठी त्यांची मदत घ्या.
 11. स्थानिक पक्षांतर्गत व महायुतीच्या अंतर्गत वाद ताबडतोब मिटवा.
 12. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या आणि जर कोणी भंग करत असेल तर त्याचा रिपोर्ट मध्यवर्ती कार्यालयात द्या.(Eknath Shinde)

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here