Skip to content

Nashik | सर्व्हायकल कॅन्सरमुळे भारतात सर्वाधिक मृत्यु – डॉ. रणजित जोशी

Nashik

Nashik |  गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने (survical cancer) देशात दरवर्षी सुमारे एक लाख पन्नास हजार महिलांचा मृत्यु होत आहे. इंग्लंड अमेरिकेसारख्या देशात जेमतेम दोन किंवा तीन आकडी मृत्यु या आजाराने होत असतात, ही बाब लक्षणीय आहे. त्यावरील उपचार व लस आता उपलब्ध असून कॅन्सरला पहिले पाऊल टाकू द्यायचे की त्यापूर्वीच उपचार करून रोखायचे हे महिलांनी ठरवायचे आहे. त्यासाठी महिलांनी प्राधन्याने लस घ्यावी असे प्रतिपादन प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ व सर्व्हायकल कॅन्सर अभ्यासक डॉ.रणजित जोशी यांनी केले.(Nashik)

राधा लक्ष्मी फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व सत्कारार्थी म्हणून ते बोलत होते. फाउंडेशनच्या संस्थापक अश्विनी देशपांडे, राधिका देशपांडे, लक्ष्मी देशपांडे, राजेंद्र अत्रे, ज्येष्ठ डॉ. यशवंत जोशी, हेमंत देशपांडे, मधुकर ब्राम्हणकर, सौ.अलूर, गिरिश पिंपळे, डी. जे. हंसवानी, विनायक रानडे, तेज टकले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Nashik)

 Insurance | तुम्ही वाहन खरेदी केले असल्यास तुम्हाला हे माहीत हवे…

Nashik | योग्य उपचार करत लढा द्यावा – वंदना अत्रे

यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने कॅन्सरवर यशस्वीपणे मात केलेल्या पत्रकार वंदना अत्रे, टेडेक्सच्या वक्त्या कमलजित पन्ना, गृहिणी सरला धाडीवाल, प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ व सर्व्हायकल कॅन्सर अभ्यासक डॉ.रणजित जोशी यांचा राधा लक्ष्मी फाउंडेशनतर्फे विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कॅन्सरवर मात केलेल्या ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सौ.वंदना अत्रे यांनी आपला अनुभव कथन करत कॅन्सरचे निदान झाल्यावर पहिले त्याचा स्वीकार करून मनाची तयारी करावी आणि योग्य उपचार करत लढा द्यावा असे आवाहन केले.(Nashik)

भारतातील पहिल्या महिला पॅराट्रुपर व सैन्यदलातील कॅप्टन डॉ. रितू बियाणी यांनी आपले अनुभव कथन केले. कॅन्सरवर मात करून त्यासाठीचे अडीच हजारांहून अधिक जनजागृती कार्यक्रम केलेल्या डॉ.रितु बियाणी यांनी कॅन्सरवर मात करून त्यानंतर एकटीने आपल्या कन्येसह अडीच लाख कि.मी. भ्रमंती सर्व देशभर केली व सगळीकडे आपल्याला लोकांचा चांगलाच अनुभव आला त्याबद्दल आपला प्रवास उलगडून दाखविला.(Nashik)

Health Tips public: टॅनिंगच्या भीतीने उन्हात बाहेर जाऊ नका? ही समस्या त्वचेमध्ये सुरू होणार नाही याची काळजी घ्या

तसेच प्रसिध्द मानसशास्त्र सल्लागार व टेडेक्सच्या वक्त्या कमलजित पन्ना यांनी शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आजार ओळखा, मनाचीही काळजी घ्या असे सांगत महिलांना बी काइंड टु माईंड असा सल्ला दिला. तसेच मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्यात कुठलाही कमीपणा मानू नका त्यातून फायदाच होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बक्षी यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी फाउंडेशनच्या संस्थापक सौ.अश्विनी देशपांडे यांनी सुरुवातीस महिला दिनास निवडलेल्या सत्कारार्थींबद्दल माहिती देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ.राखी टकले व डॉ. अश्विनी बक्षी यांनी सूत्रसंचालन केले तर सौ.शुभदा बोरा यांनी आभार मानले.(Nashik)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!