Nashik Loksabha | आचारसंहिता भंगाची पहिलीच तक्रार विद्यमान खासदारांच्या नावे

0
1
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Nashik Loksabha | आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, नाशिकच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. श्रीकांत शिंदेंनी नाशिकच्या जागेवर उमेदवार म्हणून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. एवढेच नाहीतर भाजप पदाधिकाऱ्यांनी नाशिक लोकसभेची जागा आपल्याकडे घ्यावी यासाठी चक्क पक्ष कार्यालयातच ठिय्या आंदोलनही केले. (Nashik Loksabha)

दरम्यान, यातच आता नाशिक लोकसभेच्या रिंगणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार नाशिक लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अंमलबजावणी आणि नियंत्रणासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून, या कक्षात पहिल्याच दिवशी आचारसंहिता भंगाची पहिलीच तक्रार ही खासदार हेमंत गोडसेंच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे. तर, या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.(Nashik Loksabha)

Nashik Loksabha | नेमकं प्रकरण काय..?

दरम्यान, या प्रकरणी अधिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून खासदार हेमंत गोडसे यांनी उदघाटन केलेल्या रस्त्याच्या बाजूला ‘ग्रीन बोर्ड’ लावला असून, हा बोर्ड तात्काळ झाकण्यासाठीची तक्रार परिसरातील नागरिकांनी ‘टोल फ्री’ क्रमांकाद्वारे दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.(Nashik Loksabha)

तर, या क्रमांकावर आचारसंहितेविषयीची तक्रार नोंदवली जाणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा हे नाशिक लोकसभा मतदार संघासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघाची जबाबदारी ही अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे आहे. आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.(Nashik Loksabha)

तर, पहिल्या टप्यात २४ तासांच्या आत सर्व शासकीय कार्यालये, आणि निमशासकीय कार्यालय येथील फलक झाकण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुरू केलेल्या तत्कालीन ‘शिवभोजन थाळी’ या केंद्रावर त्यांच्या फोटोसह माहिती फलक लावलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण, ते फलक अजूनही तसेच आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने हटवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेले आहेत.(Nashik Loksabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here