Loksabha Election | आमदारांना खसदारकीची संधी; काँग्रेसचे ‘हे’ उमेदवार निश्चित

0
1
Loksabha Election
Loksabha Election

Loksabha Election | देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्व पक्षांच्या गोटात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरीही काही जागांवरून तिढा कायम आहे. दरम्यान, यातच आता दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली असून, यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाविकास आघाडीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या वाट्याला १८ जागा आल्या असून, या बैठकीत या १८ जागांवरील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाला आहे. (Loksabha Election)

महाविकास आघाडीचा पुण्यातील उमेदवाराबाबत संभ्रम होता. मनसेला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात येऊ पाहणारे वसंत मोरेंच्या उमेदवारीबाबत चर्चा होती. मात्र, आता काँग्रेसच्या या यादीत पुण्याच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात झालं असून, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Loksabha Election)

Loksabha Election | आता रोज नवे धमाके होणार; शिंदे गटाचं मोठं विधान

आधिक माहितीनुसार, सोलापुरमध्ये प्रणिती शिंदे, पुण्यामध्ये आमदार रविंद्र धंगेकर या बड्या नेत्यांना उमेदवारी दिली असून, अमरावतीत बळवंत वानखेडे, नंदुरबारमध्ये माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे चिरंजीव, तर गडचिरोलीमधून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्याबाबत जवळपास निश्चित झालं आहे. तर, कोल्हापुर लोकसभा मंतदार संघातून शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस आपल्या महाराष्ट्रातील उमेदवारांची अधिकृत यादी ही उद्या किंवा परवा जाहीर करणार असून, याआधी काही निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे समोर आली आहे. (Loksabha Election)

Loksabha Election | काँग्रेसचे ‘हे’ उमेदवार निश्चित

 1. चंद्रपूर – विजय वडेट्टीवार
 2. अमरावती – आमदार बळवंत वानखेडे
 3. नागपूर – आमदार विकास ठाकरे
 4. सोलापूर – आमदार प्रणिती शिंदे
 5. कोल्हापूर – शाहू छत्रपती महाराज
 6. पुणे – आमदार रवींद्र धंगेकर
 7. नंदुरबार – गोवाशा पाडवी (माजी मंत्री के. सी पाडवी यांचा मुलगा)
 8. नागपूर – आमदार विकास ठाकरे
 9. गोंदिया- भंडारा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
 10. गडचिरोली – नामदेव किरसान
 11. अकोला – अभय पाटील
 12. नांदेड – वसंतराव चव्हाण
 13. लातूर – डॉ. कलगे(Loksabha Election)

Loksabha Election | तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार लोकसभा निवडणूक

दोन किंवा तीन जागांबाबत चर्चा सुरु

आज सकाळी दहा वाजता मुंबईत महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आय जगावतपाची शेवटची बैठक असणार आहे.  “आता फार काही वाद उरलेला नसून, दोन किंवा तीन जागांबाबत चर्चा सुरु आहे. या जागांबाबत अंतिम निर्णय हा बाकी आहे. तर, यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत जागांचा निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीतील बैठकीनंतर सांगितले. (Loksabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here