Skip to content

Sharad Pawar | लेकीसाठी पवारांची ३१ वर्षांचे वैर विसरून कट्टर विरोधकासमोर माघार

Sharad Pawar

तनुजा शिंदे : Sharad Pawar | राज्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणजेच शरद पवार हे सध्या त्यांच्या एका राजकीय खेळीमुळे चर्चेत असून, आता चक्क थोरल्या पवारांनी लेकीच्या प्रेमापोटी आपल्या कट्टर विरोधकाच्या घरचा उंबरा ओलांडला आहे. दरम्यान, बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट घेतली आहे. इतकेच नाहीतर यावली त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत गप्पा मारल्या, आणि सगळ्यांसोबत फोटोही काढले. मात्र, या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, या भेटीमागे शरद पवारांची पुन्हा काही राजकीय खेळी आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. (Sharad Pawar)

कारण ही भेट दिसते तशी सरळ आणि सोपी नव्हती. गेल्या ४० वर्षांपासून या दोन नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू होता. दरम्यान, असा अचानक अपमान, कुरघोडी, नामुष्की, राग हे सगळं विसरून पवार आणि थोपटेंची ही भेट झाल्याने आता विरोधकाच्या साथीने पवार कोणता डाव साधणार? हे पहावे लागणार आहे. या भेटीबाबतच्या साशंकता जाणून घेण्यासाठी आधी पवार थोपटे संघर्ष जाणून घेऊयात…

राज्याच्या राजकारणातील अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या स्वकर्तुत्वाने त्यांनी त्यांचे राजकीय कारकीर्द घडवली. यामुळेच त्यांना तब्बल दोनवेळा मंत्रीपदाची संधी मिळाली होती. तर एकदा मुख्यमंत्री पदाचीही संधी मिळणार होती. पण शरद पवारांमुळे त्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला अन् इथून सुरूवात झाली थोपटे-पवार वादाची.(Sharad Pawar)

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी’

Sharad Pawar | पण पवारांनी हे होऊ दिले नाही… 

तब्बल १३ वर्षे अनंतराव थोपटे यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांना कोणीही मंत्रिमंडळातून हटवू शकणार नाही अशी परिस्थिती असताना, बाबरी मशिद पडली आणि राज्यात अनेक ठिकाणी दंगली सुरू झाल्या. त्यावेळी सुधाकरराव नाईक हे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री होते. दरम्यान, ही आणीबाणीची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्याचा ठपका ठेवून त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं होतं. आणि म्हणूनच मंत्रीमंडळही बरखास्त झालं. त्यावेळी अनंतराव शिक्षणमंत्री पदी होते.(Sharad Pawar)

नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री पद शरद पवारांकडे आले. त्यावेळी अनंतरावांच्याचे काम पाहता त्यांना पुन्हा शरद पवारांच्या मंत्रिमंडळात घेतलं जाईल, हे जवळपास निश्चितच होते. मात्र, ही शंका पवारांनी फेटाळून लावली. ही घटना थोपटे यांनी त्यांची आत्मचरित्रात सांगितली आहे. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवार आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होता. त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या सर्व मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी तयार राहण्यासाठी सांगायचे. दरम्यान, या फोनसाठी थोपटे ५ मार्च रोजी सायंकाळी ५  वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट पाहत होते.(Sharad Pawar)

आपण कुठेतरी बाहेर जायचो आणि फोन यायचा, म्हणून ते कुठे बाहेरही गेले नाहीत. तर, त्या दिवशी आलेला प्रत्येक फोन हा शरद पवारांचाच असेल, असं वाटायचं. मात्र, त्यांचा फोन आला नाही. एक कार्यक्षम मंत्री म्हणून नावलौकीक असताना मला मंत्रीमंडळातून का वगळलं, हे मला कळालेच नाही. मी प्रचंड नाराज झालो, असं थोपटेंनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलं आहे. पवार आणि थोपटे यांच्यात कॉंग्रेसमध्ये मोठं होण्यासाठी संघर्ष होताच. मात्र, या घटनेनंतर हा संघर्ष आणखी वाढला.(Sharad Pawar)

NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार..?

पवारांमुळे मुख्यमंत्री पद गेलं… 

१९९३ ला मंत्रीपद हुकल्यानंतर १९९९ ला थोपटेंनी दुप्पट परिश्रम घेतले. कॉंग्रेसचे पक्षश्रेष्ठि त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. एवढंच नाहीतर जर राज्यात कॉंग्रेसची सत्ता आली. तर, मुख्यमंत्री हे थोपटेच होतील हे जाहीर झालं होतं. पण पुन्हा एकदा पवारांमुळे थोपटे मुख्यमंत्री पदाला मुकले आणि १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. यावेळी पवारांनी राष्ट्रवादीचे काशिनाथ खुटवड यांना अनंतराव थोपटेंच्या विरोधात उभं केलं आणि त्यांची नेहमीची राजकीय गुगली टाकत त्यांना निवडूनही आणलं. विधानसभेत पराभव पत्करावा लागल्याने अनंतरावांना मुख्यमंत्रीपदाची संधी गमवावी लागली.

आता पवारांना थोपटेंची गरज का भासली..?

या निवडणुकीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या बारामतीतून लढणार हे जाहीर असून, बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती शहर, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर हे ६ विधानसभा मतदार संघ आहेत.  तर, दुसरीकडे बारामतीमधूनच पवारांच्या सुनबाई आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यादेखील मैदानात उतरणार  पुरंदरमध्ये आधीच शिवसेनेचे विजय शिवतारे हे विरोधात आहेत. इंदापूरमधील दत्ता भरणे हे अजितदादांसोबत तर,  आणि हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आहेत. दौंडमध्ये राहुल कुल हे भाजप नेते असून, खडकवासल्यात तर राष्ट्रवादी सगळ्यात कमकुवत बनली आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे या भागातून ६५ हजार मतांनी मागे होत्या. विधानसभेही भाजपचाच खडकवासला मतदार संघात विजय झाला होता. (Sharad Pawar)

Sharad Pawar | शरद पवारांनी रणशिंग फुंकले; लोकसभेच्या ‘ह्या’ जागा लढवणार

लेकीसाठी योद्धा स्वत: मैदानात

आणि आता भोर मतदारसंघ, तर इथे आधीच थोपटेंसोबत पवारांचा जुना वाद आहे. अशा परिस्थितीत थोपटे नाराज राहिल्यास याचा फटका सुळेंना आगामी निवडणुकीत बसू शकतो. म्हणून लेकीसाठी पवार कट्टर विरोधकासमोर माघार घेतील असे दिसत आहे. तर, थोपटेंच्या एका शब्दावर भोर वेल्हा मुळशीतील राजकारण बदलू शकते. इतकी ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे थोपटेंचं महत्त्व हे पवारांच्या नजरेतून चुकलं नाही. दरम्यान, पोटच्या लेकीसाठी आता शरद पवार स्वत: मैदानात उतरले असून, बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत असल्याचे या भेटीवरून स्पष्ट झाले आहे. (Sharad Pawar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!