Jalgaon | धक्कादायक..! उद्घाटनापूर्वीच टोल नाका पेटवला

0
4
Jalgaon
Jalgaon

Jalgaon | टोल नाक्यांचा प्रश्न हा राज्यात तापलेला असून, यातच आता जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दरम्यान, जळगाव-धुळे रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. या घटनेत काही अज्ञात बुरखाधारी तरुणांनी या टोल नाक्याची तोडफोड केली व हा टोलनाका पेटवून दिला आहे. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा संबंधित टोल नाका आजपासून सुरु होणार होता आणि त्यापूर्वीच ही घटना घडली आहे. (Jalgaon)

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील जळगाव-धुळे रस्त्यावर असलेला सब गव्हाण गावानजीक अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या या टोलनाक्याची चार चाकी वाहनातून उतरलेल्या दोन अज्ञात बुरखाधारी तरुणांनी आज मध्यरात्री तोडफोड केली आणि हा टोलनाका पेटवून दिला. यानंतर हे तरुण चारचाकीतून पसार झाले. (Jalgaon)

Jalgaon crime | पोटच्या मुलानेच निर्घुणपणे जन्मदात्याला संपविले

उद्घाटन झाल्यानंतर टोल नाका सुरु होणार होता

हा संबंधित टोलनाका आजपासून जळगावमधील पारोळा तालुक्यात सब गव्हाण गावानजीक सुरु होणार होता. तर, आज याचा उद्घाटन सोहळा देखील आयोजित केलेला होता. या उद्घाटनाची सर्व तयारी झाली असून आज उद्घाटन झाल्यावर हा टोल नाका सुरु केला जाणार होता. मात्र, काल मध्यरात्रीच हा टोलनाका पेटवून देण्यात आला आहे. या घटनेवेळी काही कर्मचारी टोल नाका परिसरातच झोपलेले होते. टोल नाक्याला आग लागल्याचं समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. तर, यामुळे टोल कंपनीचे अंदाजे तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (Jalgaon)

Jalgaon | जळगावच्या शिव महापुराण कथेत महिला चोरांचा सुळसुळाट

Jalgaon | तरुणांचा पोलिसांकडून शोध सुरू 

आज उद्घाटन असलेल्या या संबंधित सब गव्हाण गावातील टोल नाक्याची तोडफोड आणि जाळपोळीची घटना लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवले असून, घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझवली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.  तर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या हूल्लडबाज तरुणांचा पोलिस शोध घेत असून, टोल नाका पेटवून देण्यामागे त्यांचा नेमका काय हेतू होता? याचा शोध पोलिस घेत आहेत. (Jalgaon)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here