Devendra Fadanvis | नाथाभाऊंच्या घरवापसीवर फडणवीस, महाजन नाराज..?

0
1
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis | गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होतया. यावर अखेर त्यांनीच मौन सोडले असून, येत्या 15 दिवसांत आपण भाजपमध्ये  घरवापसी करणार असल्याचे त्यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी ते म्हणाले होते की,”भाजप हे माझे एक घरच आहे. मी भाजपच्या पायाधरणीपासून पक्षात काम करत आहे. तब्बल चाळीस वर्षे मी भाजपात काम केलेले असून, काही नाराजीमुळे मी काही वर्षांपूर्वी भाजपमधून बाहेर पडलो होतो. मात्र, आता माझी नाराजी कमी झाली असल्यामुळे मी पुन्हा भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. (Devendra Fadanvis)

Devendra Fadanvis | पक्षाने आम्हाला कळवलेले नाही… 

दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन जर कोणीही पक्षात प्रवेश करत असेल. तर त्यांना कोणाचा विरोध असण्याचे काहीही कारण नाही. याबाबत अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला अद्याप काहीही कळवलेले नाही. त्यामुळे जेव्हा अधिकृतरित्या पक्ष आम्हाला ज्यावेळी काही कळवेल त्यावेळेस आम्ही त्यांचे नक्कीच स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिलेली आहे. (Devendra Fadanvis)

Praniti Shinde | ज्यांच्यासाठी मोदी महाराष्ट्रात आले, आता त्यांचा काँग्रेसला पाठिंबा

ज्यांच्यामुळे खडसेंनी भाजप सोडली ते काय म्हणाले..?

एकनाथ खडसे आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे पक्षांतर्गत काही मतभेद होते. त्यामुळेच खडसेंनी भाजप सोडल्याचे बोलले जाते. दरम्यान, आता गिरीश महाजनांनी त्यांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणेल की,” एकनाथजी हे खूप मोठे नेते आहेत. त्यांचा पक्षप्रवेश हा काही माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाहीये. त्यांचा प्रवेश असा खालती मुंबईत होणार नसून, माझा पक्षप्रवेश हा दिल्लीत होणार आहे. माझ्या वर सगळ्या ओळखी आहेत, असे ते म्हणतात. त्यामुळे ते फार मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी मी फार बोलणं हे काही संयुक्तिक नाही, अशी खरमरीत प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. (Devendra Fadanvis)

Loksabha Election | ना गोडसे, ना भुजबळ; नव्या सर्वेक्षणात नव्या नावांची चर्चा

एकनाथ खडसे परतले, मात्र कन्या पवारांसोबतच

दरम्यान, अखेर चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले. मात्र, ते जरी घरवापसी करणार असले तरीही त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार आहेत. यावर रोहिणी खडसे म्हणाल्या की,”मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, मी याच पक्षात आहे आणि पुढे भविष्यातही मी याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच … लढ़ेंगे और जीतेंगे, या शब्दांत रोहिणी खडसे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. (Devendra Fadanvis)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here