Loksabha Election | ना गोडसे, ना भुजबळ; नव्या सर्वेक्षणात नव्या नावांची चर्चा

0
2
Loksabha Election
Loksabha Election

Loksabha Election | महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा हा अजूनही सुटलेला नाही. या जागेसाठी महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही असून, शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि भाजपचे राहुल ढिकले हे इच्छुक होते. यापैकी मंत्री छगन भुजबळांचे नाव हे जवळपास फायनल होते. एवढेच नाहीतर काल त्यांच्या नावाची घोषणा होणार, असे वृत्तही झळकले. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीने नवे सर्वेक्षण सुरू केले असून, यात नव्या नावांची चर्चा सुरु आहे. महायुतीकडून नाशिक लोकसभेसाठी नव्या उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू आहे.

यात भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार अॅड. राहुल ढिकले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे या तिघांची नावे पुढे आली आहेत. महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजेंना नाशिकची उमेदवारी दिली असून, एकीकडे त्यांनी मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे अजूनही महायुतीत सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.  (Loksabha Election)

Nashik News | नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; माजी मंत्री शिंदे गटात..?

Loksabha Election | भुजबळांचे तिकीट का कापले..?

दरम्यान, महायुतीच्या या गोंधळामुळे मतदारही संभ्रमात आहेत. मतदारसंघातील सर्वे विरोधात असल्याचा अहवाल पुढे करत भाजपने हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध केला असून, छगन भुजबळांचा पराभव होण्याची शक्यता असल्याचा अहवाल शिंदे गटाने आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. तर, कुठल्याही परिस्थितीत नाशिकची जागा गमावणे हे महायुतीला परवडणारे नाही. त्यामुळे आता नव्या नावांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. भुजबळांच्या उमेदवारीला मराठा समाजाने केलेला विरोध पाहता भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास त्याचा परिणाम राज्यभरात महायुतीला भोगावा लागू शकतो. त्यामुळे एकूणच विरोधातील परिस्थिती पाहता भाजपने सावधगिरी बाळगत एक पाऊल मागे घेतले असून, नव्याने उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. (Loksabha Election)

Nashik Lok Sabha | उद्या राष्ट्रवादी भुजबळांच्या नावाची घोषणा करणार..?

नाशिकच्या जागेबाबत पुन्हा सस्पेन्स… 

दरम्यान, नाशिकच्या जागेबाबत आता पुन्हा एकदा सस्पेन्स तयार झाला असुन, महायुतीने पुन्हा एकदा राजाभाऊ वाजेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शोध मोहिम सुरू केली आहे. एकीकडे हेमंत गोडसे तिकिटासाठी कमालीचे आग्रही असून, त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. सर्व पर्याय आजमावून बघितले पण गोडसेंना अद्यापही यश मिळेना.(Loksabha Election)

यानंतर भुजबळांचे नाव चर्चेत आले. आपल्या नावावर थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब झालेला असल्याचा दावा करणारे मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी लवकरच जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर पुढे कोणी आरोप करायला नको. म्हणून विविध बँकांची थकबाकी भरायला सुरुवात केली. मात्र, आता त्यांचाही पत्ता कट झाला असून, आता महायुतीच्या या नवीन सर्वेतून कोणाचे नाव फायनल होणार आणि इतक्या मोठ्या सस्पेन्सनंतर कोण असले महायुतीचा नाशिक लोकसभेचा उमेदवार? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे असणार आहे. (Loksabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here