Skip to content

Nashik News | नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; माजी मंत्री शिंदे गटात..?

Nashik News

Nashik News | शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक असे अनेक धक्के बसले. त्यांच्या कित्येक बड्या नेत्यांनी आणि शिलेदारांनी त्यांची साथ सोडली. दरम्यान, यातच आता नाशिकमधून ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. माजी मंत्री बबनराव घोलप हे आज ठाकरेंना शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होणार आहे. (Nashik News) सध्या राज्यासह देशातही लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच आता नाशिकमधील ठाकरेंचे कडवे समर्थक बबनराव घोलप हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घोलप हे पक्षात नाराज होते. तर, लोकसभा निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का ठरणार आहे. (Nashik News)

चार वाजता वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश सोहळा

माजी मंत्री बबनराव घोलप हे शिर्डीच्या उमेदवारीत डावल्यामुळे नाराज होते. दरम्यान, आज संध्याकाळी चार वाजता ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. भाऊसाहेब चौधरी यांच्या मध्यस्थीने ते शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Nashik News)

Nashik News | नाशिकमध्ये स्थानिक- परप्रांतीय वाद; राजस्थानी व्यापाऱ्यांची केंद्र सरकारकडे धाव

Nashik News | पुत्राचा निर्णय गुलदस्त्यात 

राज्याचे माजी मंत्री असलेले बबनराव घोलप हे नाशिकमधील ठाकरे गटाचे आणि उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक असून, त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे. हा ठाकरेंसाठी एक मोठा धक्का असणार आहे. बबनराव घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप यांनी मात्र त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. तेदेखील ठाकरे गटात कार्यरत असून,  यानंतर ते वाडीलांसोबत शिंदे गटात जाणार की यांच्या शिवसेनेत जाणार की उद्धव ठाकरेंसोबत राहणार? हे पहावे लागणार आहे. तसेच बबनराव घोलप यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि काही पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. (Nashik News)

Nashik News | नाशिकमध्ये सहलीदरम्यान शिक्षकाकडून दोन विद्यार्थीनींचा विनयभंग

कोण आहेत बबनराव घोलप..?

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाचाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. यासाठी ठाकरेंचे अनेक पदाधिकारी हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून नाशिकमध्ये दाखल झाले होते. मात्र, या अधिवेशनालादेखील नाशिकमधील ठाकरेंचे बडे नेते बबनराव घोलप हेच उपस्थित नव्हते. तेव्हापासून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ते पाच वेळा आमदार आणि माजी मंत्री राहिलेले आहेत. 1990 ते 2014 या काळात ते नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदार संघातून सलग निवडून आलेले आहे. मात्र, त्यांना आता शिर्डीमधून निवडणूक लढवायची होती. मात्र, ठाकरे गटाने तिकीट नाकारल्याने ते आता शिंदे गटात दाखल होणार आहे.  (Nashik News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!