Skip to content

Maratha Kranti Morcha | भुजबळांच्या उमेदवारीचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील; नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक

Maratha Kranti Morcha

Maratha Kranti Morcha |  महायुतीत नाशिकच्या जागेवरून खडाजंगी सुरू असून, तिन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ हे मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र, अद्यापही या जागेचा तिढा सुटलेला नाही. छगन भुजबळ यांनाच नाशिकची उमेदवारी दिली जाणार असल्याचे जवळपास ठरलेले असल्याची माहीती आहे. मात्र, भुजबळांच्या उमेदवारीला नाशिकमध्ये मराठा समाज जोरदार विरोध करत असून, सकल मराठा समाजाने थेट पत्रकार परिषद घेऊन भुजबळांना आणि महायुतीला इशारा दिला आहे. (Maratha Kranti Morcha)

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेमुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आले असून, तिन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार हे मतदार संघावर दावा करत आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. कार्यकर्ता मेळव्यात श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. यानंतर स्थानिक भाजप नेते आक्रमक झाले. नाशिकमध्ये भाजपची ताकद जास्त असून, हा मतदार संघ आपल्याकडे घ्यावा. यासाठी ते आग्रही होते. या स्थानिक भाजप नेत्यांनी यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. मात्र, यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या या भांडणात अचानक छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.(Maratha Kranti Morcha)

Maratha Reservation | सदावर्तेंचे प्रयत्न फेल; मराठा आरक्षणाला स्थगिती नाही

ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असून, येथून छगन भुजबळ हे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि आपल्या नावावर थेट दिल्लीतून शिकामोर्तब झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिली होते. छगन भुजबळांचे नाव हे फायनल असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यावरून नाशिकमधील मराठा समाज प्रचंड आक्रमक झाले असून, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भुजबळांना इशारा दिला आहे. यापूर्वीही मराठा समाजाने भुजबळांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. (Maratha Kranti Morcha)

खालच्या पातळीवर बोलणाऱ्याला उमेदवारी का दिली जातेय..?

नाशिक येथे सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली असून, यावेळी ते म्हणाले की, “छगन भुजबळांना उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका समाजाविषयी इतक्या खालच्या पातळीवर बोलणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी का दिली जात आहे? असा सवाल यावेळी मराठा समाजाने केला. आमची ही पत्रकार परिषद कोणाला उमेदवारी द्यावी किंवा नाही म्हणून नाही. तसेच यावेळी त्यांनी महायुतीच्या पक्षांनाही इशारा दिला असून, ते म्हणाले की,”छगन भुजबळांना उमेदवारी देऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका. छगन भुजबळ हे कायम मराठा समाजाच्या विरोधात राहिले आहेत. भाजप म्हणते की आम्ही सर्व्हेवर चालतो. पण येथील एकही माणूस म्हणणार नाही की, भुजबळांना उमेदवारी द्या. (Maratha Kranti Morcha)

Maratha Reservation Verdic | सदावर्तेंचे मराठा आरक्षणाला आव्हान; तिढा हाय कोर्टात

Maratha Kranti Morcha | याचे  परिणाम महायुतीला भोगावे लागतील 

पुढे ते म्हणाले की,”मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही मराठ्यांना डिवचण्याचे काम करत असून, याचे  परिणाम 48 मतदारसंघात महायुतीला नक्कीच भोगावे लागतील. ज्याने मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली आहे. पावणे दोन आणि पावणे तीन लाख मतांनी पराभव झालेला असताना त्यांना पुन्हा उमेदवारी कशासाठी दिली जात आहे? तसेच यावेळी” भुजबळांच्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेउन पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले. (Maratha Kranti Morcha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!