Skip to content

Nashik Lok Sabha | उद्या राष्ट्रवादी भुजबळांच्या नावाची घोषणा करणार..?

Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha | एकीकडे नाशिकमध्ये महाविकास आघडीचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, दुसरीकडे महायुतीचा नाशिक लोकसभेचा वाद हा अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, यातच आता महायुतीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून, यानुसार उद्या नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. (Nashik Lok Sabha)

मागील दोन दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री छगन भुजबळ हे मुंबईत तळ ठोकून बसले आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केला असून, या जागेसाठी सर्व आग्रही आहेत. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांचेच नाव जवळपास फायनल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अखेर उद्या हा वाद मिटणार असून, नाशिक लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला मिळेल आणि मविआच्या राजाभाऊ वाजेंच्या विरोधातील महायुतीचा उमेदवार? उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.(Nashik Lok Sabha)

Maratha Kranti Morcha | भुजबळांच्या उमेदवारीचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील; नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक

सुनील तटकरे उद्या छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करणार..?  

उद्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊन नाशिकचे उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप देखील आग्रही होते. त्यामुळे उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास आत्तापर्यंत उशीर झाला. मात्र, आता उद्याच राष्ट्रवादी  पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी झाइर करणार असून, उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली जाऊ शकते.(Nashik Lok Sabha)

Nashik News | नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; माजी मंत्री शिंदे गटात..?

Nashik Lok Sabha | शिवसेनेचा दावा कायम 

दरम्यान, एकीकडे उद्या राष्ट्रवादी भुजबळांच्या उमेदवारीची घोषणा करणार असल्याचे बोलले जात असले. तरीही, शिंदे गटाने अजूनही नाशिकच्या जागेवर दावा करणे सोडले नाही. आधी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट तर, काल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही नाशिकची जागा ही शिवसेनेचीच असल्याचे म्हटले आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे हे सलग दोन वेळेस खासदार म्हणून निवडणून आले असून, यावेळी त्यांना हॅटट्रिक करायची आहे. त्यामुळे ते या जागेसाठी प्रचंड आग्रही असून, तिकीट मिळावे यासाठी त्यांनी उपलब्ध सर्व पर्याय आजमावून बघितले. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांची आणि पक्षाची प्रतिष्ठा येथे पणाला लागली असून, ही जागा कोणाच्या वाट्याला येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.(Nashik Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!