Deola | देवळा येथे शॉट सर्किटमुळे तब्बल तीस ट्रॉली चारा जळून खाक

0
3
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | वाजगाव (ता. देवळा) येथे रविवारी (दि. ७ ) रोजी सकाळी १० वाजता विजेच्या शॉट सर्किटमुळे जवळपास तीस ट्रॉली गुरांचा चारा जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला व भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाजगाव (ता. देवळा) येथील शेतकरी अमोल देवरे यांनी आपल्या शेतात गुरांसाठी जवळपास तीस ट्रॉली मक्याचा चारा रचून ठेवला होता. चाऱ्यालगत आदिवासी वस्ती आहे. रविवारी (दि. ७) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ह्या चाऱ्याला शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. जवळपास राहण्याच्या लोकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी चारा मालक अमोल देवरे यांना याची कल्पना दिली. घटनास्थळी लोकांनी धाव घेऊन चारा विझविण्यासाठी प्रयत्न केला. उन्हाच्या तीव्रतेने आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझविण्यासाठी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले.

Deola | श्री. रामराव आहेर पतसंस्थेस ३१ लाख रुपयांचा नफा 

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. यामुळे चाऱ्याशेजारी राहणाऱ्यआदिवासी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होती. मात्र, वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. याकामी वडाळा येथील अरुण पवार यांनी घटनास्थळी तात्काळ पाण्याचा टॅंकर पाठवून आग विझविण्यासाठी मोठी मदत केली. यात कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नसून, देवरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी धोंडगे यांनी घटनास्थळी कोतवालांस पाठवून माहिती घेतली असून, सोमवारी (दि. ८) रोजी पंचनामा केला जाणार असल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी देवरे यांनी सांगितले. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देत नुकसानीची पहाणी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deola | सुराणा पतसंस्थेस २ कोटी ७८ लाखाचा नफा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here