Skip to content

Deola | सुराणा पतसंस्थेस २ कोटी ७८ लाखाचा नफा

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च अखेर विक्रमी २ कोटी ७८ लाख इतका ढोबळ नफा झाला असून, घसारा व विविध प्रकारच्या तरतुदी वजा जाता संस्थेस १ कोटी २९ लाख ४८ हजार इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक डॉ रमणलाल सुराणा, अध्यक्ष प्रदीप सुराणा व उपाध्यक्ष संजय कानडे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती देतांना, डॉ रमणलाल सुराणा यांनी सांगितले की, संस्थेचे अधिकृत भागभांडवल २ कोटी ५० लाख असून वसूल भागभांडवल २ कोटी ११ लाख ४५ हजार रुपये आहे. संस्थेकडे विविध प्रकारचा २१ कोटी ९७ लाखाचा स्वनिधी जमा असून जमा असून हा निधी संस्थेचा पाया किती भक्कम आहे हे दर्शवितो. संस्थेच्या ठेवी ५३ कोटी ९५ लाख, कर्जवाटप २७ कोटी १० लाख ७९ हजार इतके आहे. संस्थेची आर्थिक वर्षात ८१ कोटीपेक्षा अधिक उलाढाल झालेली असून, संस्थेचे खेळते भांडवल ७९ कोटी ५९ लाख इतके आहे. संस्थेने ४९ कोटी ३० लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. नेट एनपीए ०% आहे. निव्वळ थकबाकी १.४९% इतकी आहे.

Deola | खर्डे श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटीच्या अध्यक्ष पदी ह.भ.प सुखदेव देवरे

संस्थेचे संचालक मंडळ निस्वार्थीपणे कार्यरत असून ठेवीदारांचा व कर्जदारांचा दृढ विश्वास संस्थेवर आहे. पारदर्शी कारभार, तत्पर व विनम्र सेवा देण्यासाठी संस्था जिल्हाभर ओळखली जाते. सोने चांदी व्यवहारासाठी ग्राहक संपूर्ण जिल्ह्यातून येत असतात, अतिशय पारदर्शी व्यवहार, सोने चांदी तारण कर्जास कोणत्याही सहकारी बैंक पतसंस्थेपेक्षा सर्वात कमी ७.९५% इतका वाजवी व्याजदर ठेवला आहे. सोने चांदी तारण कर्जासाठी संस्थेने कुठेही नसलेली अशी सोने टेस्टिन सुविधा चालू केली आहे. त्यामुळे गडबड घोटाळा न होता सुरक्षित व्यवहार होतो. याप्रसंगी अध्यक्ष प्रदीप सुराणा, उपाध्यक्ष संजय कानडे, संचालक रमेश संकलेचा, ईश्वर सुराणा, राजेंद्र सुराणा, निलेश कांकरिया, अशोक गुळेचा, सुनिल बुरड, मनोज ठोलीया, संतोष लोढा, सुभाष सोनवणे, जनार्दन शिवदे, संचालिका सुरेखा सुराणा, शोभा सूर्यवंशी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
Deola | देमको बँकेस आर्थिक वर्षाच्या अखेरीस २ कोटी ८६ लाख ७५ हजार रुपयांचा नफा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!