Skip to content

Deola | खर्डे श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटीच्या अध्यक्ष पदी ह.भ.प सुखदेव देवरे

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  खर्डे येथील ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सव निमित्ताने आयोजित यात्रा कमिटीच्या अध्यक्ष पदी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक सुखदेव देवरे यांची तर उपाध्यक्ष पदी भास्कर बाबा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्डे येथे बुधवार (दि १७) एप्रिल रोजी रामनवमी निमित्ताने पारंपरिक पद्धतीने यात्रा भरते. राम जन्मोत्सव कार्यक्रम साजरा करण्यासाठी श्रीराम मंदिरात बैठक घेण्यात आली. यात सर्वानुमते यावर्षी च्या यात्रोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सुखदेव देवरे यांची तर उपाध्यक्ष पदी भास्कर बाबा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर सदस्यांचीही यावेळी नियुक्ती करण्यात येऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Deola | देमको बँकेस आर्थिक वर्षाच्या अखेरीस २ कोटी ८६ लाख ७५ हजार रुपयांचा नफा

याठिकाणी रामनवमी निमित्ताने श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासून रोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी रामायण कथा सुरू होईल. (दि १७) रोजी रामनवमीला राम जन्मोत्सवानिमित्ताने सकाळी ९ ते १२ पर्यंत मंदिरात ह.भ.प अनंत महाराज कजवाडेकर यांचे कीर्तन, सायंकाळी रथाचा लिलाव होऊन मानकऱ्यांच्या शुभहस्ते रथाची सम्पूर्ण गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येईल. करमणूक म्हणून रात्री लोकनाट्य तमाशा, गुरुवारी (दि १८) रोजी सकाळी तमाशा कलावंताची मंदिरा समोर हजेरी, दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. राम नवमीला गावाची यात्रा असल्याने नोकरी व व्यवसाया निमित्ताने बाहेर गावी असलेली मंडळी दर्शन व यात्रेसाठी गावाकडे येते.

यामुळे गावांत यानिमित्ताने चैतन्य निर्माण होऊन सम्पूर्ण गाव उत्साहवर्धकात न्हाऊन निघते.
यात्रेसाठी पंचक्रोशीतील लोक येतात. विविध प्रकारचे दुकाने थाटली जातात. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने अर्थीक संकट उभे ठाकले आहे. याचा परिणाम यात्रेवर जाणवू शकतो. नागरिकांनी याकामी सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Deola | देवळा-नाशिक रस्त्यावर आयशरमधून अवैध मद्यसाठ्याची वाहतूक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!