Skip to content

Shivsena | भाजपच्या नाराजी अहवालामुळे शिंदेंच्या ४ खासदारांचा ‘पत्ता कट’..?

Shivsena

Shivsena | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात जागावाटपावरुन मोठे घमासान सुरू असून, हा संघर्ष आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. नुकतीच महायुतीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून, यानुसार भाजपने शिंदे गटाच्या ४ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने जाहीर केलेल्या यादीतील उमेदवारांचेही तिकीट आता धोक्यात आहे. तर, शिंदेंसोबत आलेल्या १३ विद्यमान खासदारांपैकी हिंगोलीचे हेमंत पाटील आणि यवतमाळच्या पाच टर्म पासूनच्या खासदार भावना गवळींचा पत्ता कट झाला आहे. (Shivsena)

दरम्यान, हिंगोलीमधून शिंदे गटाने यादीत हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर केली असूनही आता त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता हेमंत पाटील आणि भावना गवळींनंतर नाशिकच्या हेमंत गोडसेंचे आणि हातकणंगल्याच्या धैर्यशील मानेंचं काय होणार? याबाबत उत्सुकता आहे. शिंदे गटाने 28 मार्चला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यापैकी हेमंत पाटील आणि आग्रही असलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना भाजपचा विरोध असल्याने त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. (Shivsena)

Govinda in Shivsena | अखेर गोविंदा शिवसेनेत; शिंदेंनी दिली ‘ही’ जबाबदारी

Shivsena | म्हणून तिकीट कापले..?

शिंदे गटाने जाहीर केलेल्या आठपैकी सात खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली होती. त्यापैकी रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने यांचे तिकीट आधीच कापण्यात आले होते. दरम्यान, आता मतदार संघातील लोकांमध्ये असलेल्या नाराजीच्या अहवाल पुढे करत हिंगोलीच्या हेमंत पाटील आणि हातकणंगल्यातील धैर्यशील मानेंच्या उमेदवारीलादेखील भाजपने विरोध केल्याने आता यांचीही उमेदवारी धोक्यात आली आहे. (Shivsena)

तर, धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याची शक्यता असून, दुसरीकडे हेमंत पाटील यांच्याएवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे यवतमाळच्या पाच टर्म पासूनच्या विद्यमान खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची बहीण असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट आपोआप कापले गेले आहे.

या खासदारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या 13 खासदारांपैकी यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील आणि रामटेकच्या कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले गेले असून, हातकणंगलेचे धैर्यशील माने आणि नाशिकचे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरही टांगती तलवार आहे.  (Shivsena)

Shivsena | शिंदेंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर;…पण प्रमुख नेत्याचे नावच नाही

हेमंत गोडसेंचे काय..?

भावना गवळी आणि हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असून, त्यापैकी गावळींचे तर तिकीट गेले. मात्र आता नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यावरही लवकरच निर्णय होणार असून, आज किंवा उद्या शिंदे गटाची यादी जाहीर होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, “अडचणीच्या काळात उद्धव ठाकरेंची साथ सोडून आम्ही तुमच्यासोबत आलो आणि आता आम्हालाच उमेदवारीसाठी झगडावं लागतंय, अशी भावना या खासदारांची असून, ज्यांचे तिकीट भाजपमुळे कापले गेले. ते खासदार शिंदेंवर नाराज आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडामोडी होणार ते पहावे लागणार आहे. (Shivsena)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!