NCP | उदयकुमार आहेरांवर राष्ट्रवादीच्या ‘प्रवक्ते’ पदाची जबाबदारी

0
22
NCP
NCP

NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला असून, त्यांनी नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकत निर्माण केली. त्यांच्या कामाची दाखल घेऊन पक्षाची ध्येय, धोरणे आणि भूमिका या प्रसार माध्यमांसमोर मांडण्यासाठी उदयकुमार आहेर यांच्यावर पक्षाने प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली आहे.

NCP | उदयकुमार आहेर यांची राजकीय कारकीर्द

उदयकुमार आहेर हे तब्बल २३ वर्ष विनायक मेटे यांच्या सोबत काम करत असून, ते मेटे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. उदयकुमार आहेर हे देवळा तालुक्यातील ओबिसी महामंडळाचे पहिले संचालक होते. यानंतर शिवसंग्राम संघटनेचे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष, दोन वेळा युवक अध्यक्ष, पक्षाचे प्रवक्ता आणि सरचिटणीस अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. (NCP)

Ajit Pawar | शालिनीताईंचा मानसिक तोल ढासळला; उदयकुमार आहेरांचे प्रत्युत्तर

आंदोलनांमुळे आजपर्यंत त्यांच्यावर २९ पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाली आहेत. मराठा आरक्षणाच्या विषयावर त्यांचे पुण्यातील ‘ढोल बजाव मराठा आक्रोश’ आणि अशी अनेक आंदोलन गाजलेली आहेत. आक्रमक वक्तृत्व शैली आणि माणसे जोड्याचे राजकीय कसब यामुळे त्यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडले आहेत. विनायक मेटेंच्या निधनानंतर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच ज्योती मेटे यांना विधान परिषदेत घेत मंत्रीपद देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली होती.(NCP)

मात्र, उदयकुमार आहेर यांच्या पत्नी अश्विनी आहेर यांचा देवळा नगरपंचायतीत पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारण सोडले. त्यामुळे राजकारणातून उदयकुमार संपले अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, यावर जाहीर सभेत त्यांनी देवळा शहरातील ही निवडणुक शेवटची असल्याचे सांगितले. स्थानिक राजकारणातून दूर असले. तरी राज्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न केला आणि काहीअंशी ते यात यशस्वीही ठरले.(NCP)

देवळा | उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांची उपोषण मागे घेण्याची विनंती

विनायक मेटे यांच्या अकाली निधनाला ४ महिने ही उलटले नाहीत. तोच संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या उदयकुमार आहेर यांना पदावरून पदमुक्त करण्यात आले. यानंतर उदय आहेर यांनी राजकारणातून काही दिवस एक्झीट घेतली होती. मात्र, यानंतर ते आपल्या पदाधिकाऱ्यांसह स्वगृही परतले आणि त्यांनी अजित दादांचे घड्याळ हाती बांधत राजकारणात जोरदार कमबॅक केले.(NCP)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here