Skip to content

Govinda in Shivsena | अखेर गोविंदा शिवसेनेत; शिंदेंनी दिली ‘ही’ जबाबदारी

Govinda in Shivsena

Govinda in Shivsena |  आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्ष प्रवेश होत आहेत. यातच बॉलीवुड अभिनेता गोविंदा अहुजा यानेही नंबर लावला आहे. आता गोविंद याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अखेर या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला. गोविंदासोबत अभिनेत्री करिश्मा आणि करीना कपूर यादेखील एकनाथ शिंदेंच्या भेटीला आल्या आहेत. अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी दिली जाणार अस्लयची शक्यता आहे. मार, अद्याप घोषणा झाली नाही. (Govinda in Shivsena)

काल रात्री अभिनेता गोविंदा याने माजी आमदार कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती. यानंतर गोविंदा यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याचेही माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं. उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघात गोविंदा याच्या रूपात शिवसेना नवा चेहरा उतरवला जाणार असल्याची चर्चा आहे. यावेळी शिंदे गटातील पक्ष प्रवेशानंतर अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि गेल्या १४ वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राम राज्यात प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले. (Govinda in Shivsena)

Hemant Godse | भुजबळांच्या नावाची चर्चा अन् गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे रवाना

Govinda in Shivsena | गोविंदा हे पक्षाचे स्टार प्रचारक

बॉलीवुड अभिनेता गोविंदाने २००४ मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवून त्यावेळी त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत त्यांच्या राम नाईकांचा पराभव केला होता. मात्र, मध्यंतरी गोविंदाने राजकारणापासून दूर राहणे त्यांनी पुन्हा बॉलीवुडकडे मोर्चा वळवला होता. दरम्यान, शिंदे गटाकडून गोविंदा याला तिकीट देण्याची शक्यता आहे. तर, अभिनेता गोविंदा अहुजा हा आता उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अमोल किर्तीकरांना तगडे आव्हान ठरू शकतो. मात्र, यावेळी उमेदवारीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तर, गोविंदा हे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. (Govinda in Shivsena)

Mahayuti Seat Sharing | गोडसेंना पुन्हा आश्वासन; रात्री ‘वर्षा’वर काय काय घडलं..?

एखादा चालणारा अभिनेता तरी घ्यायचा.. 

दरम्यान, या पक्ष प्रवेशावर विरोधी पक्ष नेते जयंत पाटील यांनी टिका केली असून, ते म्हणाले की,”गोविंदाचे चित्रपट चालत नाही. एखादा चालणारा अभिनेता तरी घ्यायचा.” या शब्दात जयंत पाटलांनी गोविंदाच्या पक्ष प्रवेशावर टिका केली होती. तर, यावर एकनाथ शिंदे यांनी “अभिनेता गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला अभिनेता आहे. अशा शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले. (Govinda in Shivsena)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!