Hemant Godse | भुजबळांच्या नावाची चर्चा अन् गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे रवाना

0
1
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Hemant Godse |  गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आधी श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर तातडीने भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आले. त्यांच्यापुढे भाजप आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला आणि नाशिकची जागा भाजपकडे घेण्याची मागणी केली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाहीतर, यानंतर हेमंत गोडसे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच यावेळी उमेदवारीची मागणीही केली. (Hemant Godse)

मग यानंतर भाजप नेते कसे शांत राहतील. दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भाजप आमदार आणि पदाधिकारी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी नाशिक लोकसभेत आपले आमदार असून, भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे ही जागा आपल्याला घायावी, अशी मागणी केली. मात्र, यानंतर नाशिकच्या राजकारणात आला मोठा ट्विस्ट कारण शिवसेना आणि भाजपच्या या वादात राष्ट्रावादी अजित पवार गटाने उडी मारली आणि या जागेवरू आता मंत्री छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली. (Hemant Godse)

Hemant Godse | नाशिकच्या जागेसाठी गोडसेंचे मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन

दरम्यान, आपले तिकीट धोक्यात असल्याच्या चर्चांना उधाण येताच. काल रात्री उशीरा खासदार हेमंत गोडसेंनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली आणि मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या वेदना मांडल्या. तर, काल वर्षा बंगल्यावर जणू नाराजी दूर करण्याचा कार्यक्रमच होता. महायुतीतील अनेक नाराज नेत्यांनी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्ऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि वारिष्ठांनीही या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (Hemant Godse)

Hemant Godse | हेमंत गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 

दरम्यान, नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे आता पुन्हा  मुख्यमंत्ऱ्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. आज  हेमंत गोडसे पुन्हा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार असून, काल रात्री ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले होते. तर, कालच्या भेटीतही नाशिकची जागा ही शिवसेनेकडेच असेल आणि हेमंत गोडसेंनाच उमेदवारी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. (Hemant Godse)

Mahayuti Seat Sharing | गोडसेंना पुन्हा आश्वासन; रात्री ‘वर्षा’वर काय काय घडलं..?

नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक 

हेमंत गोडसेंसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. तब्बल दोन तास यांच्यात खलबतं झालीत. दरम्यान, या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तर, आता नाशिकच्या जागेवर तिकीट मिळविण्यासाठी हेमंत गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत. तर, छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याचे कळताच नाशिकमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. अशी कोणासाठीही जागांची आदलाबदली होऊ शकत नाही आणि नाशिकची जागा ही शिवसेनेचीच असल्याचा विश्वासही यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (Hemant Godse)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here