Skip to content

Deola | देवळा महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची सैन्य दलात भरती

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा येथील राष्ट्रीय छात्र सेना व इतर शैक्षणिक विभागातील ७ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली.
भारतीय सैन्य अग्निवीर मेळावा मुंबई या ठिकाणी नुकताच पार पडला, त्यात रत्नाकर समाधान गुंजाळ (वाखारी), ज्ञानेश्वर मोठाभाऊ बच्छाव (रामेश्वर), भूषण राजेंद्र अहिरे (वरवंडी), वैभव विश्वनाथ खैर (सुभाष नगर), भावेश अभिमन देवरे (खर्डे), सचिन भामाजी आहेर (देवळा), रोशन रवींद्र सूर्यवंशी (खालप) या विद्यार्थ्यांची अग्निवीर म्हणून निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Deola | डोंगरगावात राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला; आरोपींना अटक

अग्निविरांच्या या कौतुक सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या सचिव प्रो. डॉ. मालती आहेर यांनी देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सैन्य दलात भरती व्हावे व देश सेवा करावी असे सांगून भरती झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय सैनिक दलात भरती होण्यासाठी या युवकांनी घेतलेला निर्णय, त्यांचे परिश्रम याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर यांनी यावेळी केले. या सोहळ्यासाठी उपप्राचार्य पी.एन. ठाकरे, कार्यालयीन अधीक्षक दिनेश वाघमारे यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमुख लेफ्टनंट बादल लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. काजल पाटील हिने आभार मानले.

Deola | देवळा तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज – तहसीलदार मिलिंद कुलकर्णी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!