Deola | देवळा तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज – तहसीलदार मिलिंद कुलकर्णी

0
1
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण साठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तालुक्यात एकाही ठिकाणी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. लोकसभेच्या निवडणुकीसाठी ११२ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची व ११ पर्यवेक्षक अशा एकूण १२३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालूक्यता एकूण १लाख १४ हजार ३४५ मतदार संख्या असून यात पुरुष मतदार ५९५१२ व महिला मतदार ५४८३३, आहेत. एकूण ११२ मतदान केंद्रांपैकी शहरात ८ व ग्रामीण भागात १०४ अशा मतदार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

Deola | देवळा नगरपंचायतीच्या वतीने शहरात मतदान जनजागृती मोहीम

तालुक्यात एकूण ५९२ दिव्यांग मतदार असून यात पुरुष ४१४,स्त्री -१७८ आहेत . ८५ वर्षावरील १६२४ मतदार असून यात पुरुष ५८३, स्त्री १०४१ मतदार आहेत. ११२ मतदान केंद्रांपैकी ७७ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यात आदर्श मतदान केंद्र म्हणून लोहोणेर येथील मतदान क्रंमाक ६ ची निवड करण्यात आली असून, यात गुंजाळ नगर येथील मतदान क्रमांक ५९ मध्ये युवा कर्मचारी मतदान व विजय नगर येथील मतदान क्रमांक ५२ मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here