Skip to content

Nashik Loksabha | दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ; नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी

Nashik Lok Sabha

Nashik Loksabha |  राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली असून, यानुसार महायुतीने नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरले आहे. कालपर्यंत नाशिकची जागेसाठी शिंदे गट आणि भजपमध्ये चुरस होती. याआधी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर नाशिकमधील भाजप पदाधिकारी यावरून आक्रमक झाले होते. नाशिकची जागा आपल्याला घ्यावी यासाठी पदाधिकारी आणि आमदार हे देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करण्यासाठीही गेले होते. मात्र, यातच आता नाशिक लोकसभेत मोठा ट्विस्ट आला असून, ना भाजप आणि ना  शिवसेना ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली असून, या जागेवर आता छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Nashik Loksabha)

आज सकाळीच ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, यात विजय करंजकर यांना डावलून नाशिक लोकसभेची उमेदवारी ही राजाभाऊ वाजे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे या उमेदवाराला तागडे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी सुरू होती. मात्र, आता अखेर छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Loksabha)

Shrikant Shinde | श्रीकांत शिंदेंनी केली हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा

Nashik Loksabha | अशी झाली अदलाबदली

महायुतीत राज्यातील दोन महत्वाच्या जागांवरुन रस्सीखेच सुरू होती. साताऱ्याची जागा ही अजित पवार गटाकडे होती. मात्र, साताऱ्यातून उदयनराजे लोकसभेसाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी दिललीवारीही केली. तसेच त्यांनी अजित पवार गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासही नकार दिला होता. त्यामुळे अखेर त्यांच्या या हट्टापुढे भाजपला माघार घ्यावी लागली.

आणि साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा ही अजित पवार गटाकडे आली. दरम्यान, आता साताऱ्यातून उदयनराजे आणि नाशिकमधून छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार असणार असल्याची माहिती समोर आली असून, एवढंच नाहीतर, साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात उदयनराजेंच्या एवजी आता उरलेल्या दोन वर्षांसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार आता राज्यसभेवर जाणार आहे. (Nashik Loksabha)

Hemant Godse | नाशिकच्या जागेसाठी गोडसेंचे मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन

हेमंत गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसामोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तर, यावेळी मुख्यमंत्र्यांनीही नाशिक आपला बालेकिल्ला असून, ही जागा आपल्याला मिळावी. यासाठी मी देखील आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर, हेमंत गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर लगेच भाजपचे आमदार आणि पदाधिकारीदेखील नाशिकची जागा भाजपकडे घ्यावी या मागणीसाठी फडणवीसांच्या भेटीला गेले होते. त्यात आता छगन भुजबळांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला निघाले आहेत. आता मुंबईत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.(Nashik Loksabha)

भुजबळांच्या उमेदवारीनंतर शिवसेना आक्रमक 

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, नाशिकची जागा आम्ही सोडणार नाही. इतर कोणाची मर्जी राखावी म्हणून अशी जागांची अदलाबदल होत नाही. आमचा तीन टर्मचा खासदार असताना आम्ही नाशिकची जागा सोडणं हे अशक्य असल्याची आक्रमक भूमिका नाशिकमध्ये शिवसेनेने घेतली आहे.(Nashik Loksabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!