Deola | देवळा नगरपंचायतीच्या वतीने शहरात मतदान जनजागृती मोहीम

0
14
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याकरिता देवळा नगरपंचायतीच्या वतीने शहरातील मतदारांनी मतदान करावे यासाठी विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले असून, ज्या मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी कमी आहे, अशा मतदान केंद्रांवर सलग्न असणाऱ्या मतदारांसाठी विशेष जनजागृती मोहिम हाती घेतलेली आहे.

Deola | देवळा-कळवण रोडवरील तुळजाई आटोमोबाईल्स दुकानाला भीषण आग

११८ चांदवड, विधानसभा मतदार संघ अंतर्गत जनजागृतीचा भाग म्हणून शहरात स्वीप कार्यक्रमा अंतर्गत मतदारांची प्रतिज्ञा प्रसिद्ध केली असून, त्या दाखल स्वाक्षरी करण्याची मोहिमेकरिता डिजिटल बॅनर देवळा शहरात लावण्यात आले आहेत. नागरिकांनी मतदानाची प्रतिज्ञा घेवून आपली सेल्फी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. डिजिटल बॅनर व सेल्फी पॉईंटचे अनावरण प्रमोद ढोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी, माणिक वानखेडे, आशिष महाजन, अपूर्वा डोळे, जुगल घुगे, शरद पाटील, सागर बच्छाव, तुषार बोरसे आदी कर्मचारी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here