Skip to content

Deola | देवळा-कळवण रोडवरील तुळजाई आटोमोबाईल्स दुकानाला भीषण आग

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील देवळा कळवण रोडवरील तुळजाई आटोमोबाईल्स ह्या दुकानाला आजरात्री ठीक आठ वाजेच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी (दि २६) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळे यांच्या मालकीच्या तुळजाई आटोमोबाईल्स ह्या दुकानाला शॉट सर्किटमुळे आग लागली.

Deola | राष्ट्रपती पदक पुरस्कृत उपनिरीक्षक विनय देवरे यांचा वाय.बी.एस ग्रुपतर्फे सत्कार

ह्यात स्पेअर पार्ट, ऑइल, फर्निचर, कम्प्युटर ,सीसीटीव्ही कॅमेरे, महत्त्वाचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाले. यामुळे शेवाळे यांचे जवळपास 56 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ह्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सम्पूर्ण ऑईलसह, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. यावेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. दुकानात विक्रीसाठी ऑईलअसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनास्थळी तलाठी उमेश गोप नारायण यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेवाळे यांनी सांगितले असून, भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!