Shivsena UBT | ‘हे’ आहेत ठाकरेंच्या सेनेचे लोकसभेचे उमेदवार..?

0
16
Shivsena UBT
Shivsena UBT

Shivsena UBT |  राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गोटात जगावाटपाचा तिढा हा अजूनही सुटलेला नाही. तर, भाजपने आतापर्यंत राज्यातील उमेदवारांच्या तीन यादी जाहीर केल्या असून, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार भाजपच्या जवळपास सर्व उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या नावांची यादि ही उद्या जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली असून, अधिक माहितीनुसार ठाकरेसेनेच्या पहिल्या यादीत  १५ ते १६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. (Shivsena UBT)

Kangana Ranaut | भाजपच्या पाचव्या यादीत राज्यातील या उमेदवारांना संधी

ठाकरेंकडे कोणते मतदारसंघ..?

पहिल्या यादीत ज्या जागांवर आतापर्यंत शिक्कामोर्तब झाला आहे. अशाच जागांची घोषणा करणार आहे. यात रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या जागांचा समावेश असू शकतो. तसेच छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, सांगली, मावळ या जागांवरीलही उमेदवारांची घोषणा शिवसेना ठाकरे गटातर्फे केली जाऊ शकते. दरम्यान, आज महाविकास आघाडीत ज्या जागांवरून वाद सुरू आहे. त्या जागावाटपाबाबत आज निर्णय होऊ शकतो. आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची निर्णायक बैठक होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. (Shivsena UBT)

BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी

Shivsena UBT | ठाकरे गटाची संभाव्य यादी 

  • 1. दक्षिण मुंबई मतदार संघ – अरविंद सावंत
  • 2. उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघ – अमोल कीर्तीकर
  • 3. उत्तर पूर्व मुंबई मतदार संघ – संजय दिना पाटील
  • 4. दक्षिण मध्य मुंबई मतदार संघ – अनिल देसाई
  • 5. रायगड मतदार संघ – आनंद गीते
  • 6. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ – विनायक राऊत
  • 7. ठाणे मतदार संघ – राजन विचारे
  • 8. धाराशिव मतदार संघ – ओमराजे निंबाळकर
  • 9. परभणी मतदार संघ – संजय जाधव
  • 10. सांगली मतदार संघ –  चंद्रहार पाटील
  • 11. मावळ मतदार संघ – संजोग वाघेरे
  • 12. शिर्डी मतदार संघ – भाऊसाहेब वाकचौरे
  • 13. बुलढाणा मतदार संघ – नरेंद्र खेडेकर
  • 14. हिंगोली मतदार संघ – नागेश पाटील आष्टीकर
  • 15.छत्रपती संभाजीनगर मतदार संघ -चंद्रकांत खैरे
  • 16. यवतमाळ वाशिम मतदार संघ – संजय देशमुख(Shivsena UBT)

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here